Mumbai News: धक्कादायक! माजी कुलगुरूंना मारहाण, प्राध्यापकांसह सहा जणांवर गुन्हा दाखल
मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु यांच्यावर घरात घुसुन जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
Mumbai News: मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु यांच्यावर घरात घुसुन जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेअंतर्गत पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.हल्लेखोरांपैकी एक जण निलंबित प्राध्यापक असल्याची माहिती आहे. या जीवघेण्या हल्ल्यात कुलुगुरु गंभीर जखमी झाले आहे. डॉ. अशोक प्रधान असं पीडीत कुलगुरु यांच नाव आहे. चार वर्षांपूर्वी शैक्षणिक संस्थेतील या हल्लेखोर प्राध्यापकांचे गैरवर्तन आणि कामाबद्ल संस्थेच्या अनेक शाखांनी तक्रारी केल्यामुळे त्यांना कामावरून निलंबित केले होते.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ.अशोक प्रधान कल्याण पश्चिम भागातील कर्णिक रोडवरील प्रधान बंगल्यात राहत होते. चार वर्षांपुर्वी गैरवर्तन प्रकरणी संजय जाधव यांना प्राध्यपाकावरून निलंबित केले होते, या गोष्टीचा राग मनात धरत त्यांनी कुलगुरुवर हल्ला केला. १९ नोव्हेंबरच्या सांयकाळी संजय जाधव हे चार मित्रांसह घरात घुसले आणि त्यांना बेदम मारहाण केली. या घटने डॉ. अशोक गंभीर जखमी झाले. घटनेनंतर सर्वजण फरार झाले. अशोक यांना रुग्णालयाक दाखल करण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली.
या प्रकरणी कल्याण येथील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात भारतीय दंड संहितानुसार गुन्हा दाखल करुन घेतला. निलंबित प्राध्यापक संजय जाधव (वय 50), त्याचा साथीदार संदेश जाधव (वय 32), एक अल्पवयीन आणि एका महिलेसह दोन अनोळखी पुरुष अशी आरोपींची नावे आहेत. हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली.
(The above story first appeared on LatestLY on Nov 21, 2023 03:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

