पुण्यातील (Pune) बिबवेवाडी (Bibwewadi) परिसरात एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. एका कबड्डीपटू मुलीवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. मुख्य आरोपीसह तिघांनी मिळून मृत मुलीवर कोयत्याने हल्ला चढवला. या प्रकरणी बिबेवाडी पोलीस ठाण्यात (Bibwewadi Police Station) गुन्हा दाखल झाला आहे.या घटनेनंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असू पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा पोलिसांना संशय आहे.
क्षितीजा अनंत व्यवहारे (वय, 14) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. क्षितीजा ही कबड्डीपटू असून नियमितपणे कब्बडीचा सराव करण्यासाठी संध्याकाळी यश लॉन्स परिसरात आली होती. त्यावेळी आरोपी तिच्याजवळ आला आणि तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर राग अनावर झाल्याने आरोपीने आपल्यासोबत आणलेल्या कोयत्याने क्षितिजावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या क्षितीजाचा जागेवरच मृत्यु झाला आहे. या घटनेनंतर आरोपी आणि त्याच्यासो आलेल्या दोघाजणांनी घटनास्थळावरून पळ काढला. यातील एक आरोप तिच्या नात्यातला होता, अशी माहितीसमोर आली आहे. हे देखील वाचा- Solapur: मळणी यंत्र ठरले जीवघेणे, सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेसह बिबवेवाडी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच एकतर्फी प्रेमातून खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.