
मुंबईत (Mumbai) गणपती उत्सवावेळी दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याची खोटी माहिती देणाऱ्या एका 32 वर्षीय तरुणाला पोलिसांनी बुधावारी (24 जुलै) अटक केली आहे. शहरातील काही मुख्य ठिकाणांसह मुंबईत येत्या गणपतीला हल्ला होणार असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
प्रसाद प्रदीप रसाळ असे तरुणाते नाव असून तो पुणे येथे राहणारा आहे. प्रसाद काही कामासाठी रविवारी मुंबईत आला होता. त्यावेळी रसाळ याने विलेपार्लेमधील पोलीस स्थानक गाठत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती तेथील पोलिस वरिष्ठांना दिली. तसेच मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर आणि कोल्हापूर येथे सुद्धा हल्ला होणार असल्याचे रसाळ याने पोलिसांना सांगितले.(सोलापूर: शिक्षण घेण्यासाठी पैसे नसल्याच्या नैराश्यात विद्यार्थीनीची विष प्राशन करुन आत्महत्या)
रसाळने तीन संशयित व्यक्ती या दहशतवादी हल्लाबद्दल बोलताना ऐकले असल्याचे सुद्धा पोलिसांना सांगितले. यानुसार पोलिसांनी शोध सुरु केला. परंतु रसाळ याने दिलेल्या माहितीत काही तथ्त नसून ती खोटी असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर रसाळ याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी त्याला जाब विचारला असता उद्योगधंद्यात नुकसान झाल्यामुळे तणावाखाली असल्याने पोलिसांना खोटी माहिती देण्याचे ठरविले असल्याचे स्पष्टीकरण रसाळ याने दिले. तर पोलिसांना खोटी माहिती दिल्याबद्दल विविध कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई केली आहे.