Prime Minister Narendra Modi | (Photo Credits: ANI)

National Conference of DGPs, IGPs in Pune: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) पुणे येथे मुक्कामी आहेत. पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय परिषदेसाठी ते पुणे येथे आले असून, ते आज (7 डिसेंबर 2019) सकाळी परिषद पार पडत असलेल्या ठिकाणी पोहोचले आहेत. देशभरातील जवळपास सर्व पोलीस महासंचालक या परिषदेसाठी पुणे येथे उपस्थित आहेत. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी (६, ७, ८ डिसेंबर) या कालावधीत पुणे येथे देशभरातील पोलीस महासंचालकांची राष्ट्रीय परिषद पार पडत आहे.

दरम्यान, या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे काल (शुक्रवार, 6 डिसेंबर 2019) रात्रीच पुणे येथे दाखल झाले. राजशिष्टाचारानुसार महाराष्ट्रेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्रात बदललेल्या राजकीय समिकरणांच्या पार्श्वभूमिवर या दोन्ही नेत्यांमध्ये प्रत्यक्ष झालेली ही पहिलीच भेट होती. (हेही वाचा, PM Narendra Modi Pune Visit: सत्तास्थापनेच्या वादंगानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यात घेणार पीएम नरेंद्र मोदींची भेट; जाणून घ्या कारण)

प्राप्त माहितीनुसार, या परिषदेत देशातील आंतर्गत सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच, त्यावर चर्चाही होणार आहे. या परिषदेस राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सल्लागार अजित डोभाल, उपसल्लागार दत्ता पडसलगीकर यांच्यासह १८० हून अधिक वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. या परिषदेस देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी काल (6 डिसेंबर 2019) मार्गदर्शन केले. तर आज पंतप्रधान मोदी मार्गदर्शन करण्याची शक्यत आहे.