Pune Porsche Accident Case: पुणे पोर्श कार अपघातात नवी माहिती समोर येत आहे. हा अपघात घडला त्यादिवशी सकाळी ११ वाजता ससून रुग्णालयात आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मात्र, या रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत घेत यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. (हेही वाचा:Pune Porsche Accident: पोर्शे कार अपघात प्रकरण; अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार, 2 डॉक्टरांना अटक)
पुण्यात बेदरकारपणे कार चालवून अल्पवयीन आरोपीने एका दुचाकीला धडक दिली होती. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेचे नंतर तीव्र पडसाद उमटले. आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. तसेच आरोपीच्या आजोबांना अटक करण्यात आली. या सर्व घटनेत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. रक्ताचे नमुने आरोपीचे नसल्याचे समजत आहे.
पोलीस आयुक्त काय म्हणाले?
“१९ तारखेला ११ वाजता आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यामध्ये फेरफार करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. रक्ताचे नमुने घेतल्यानंतर ते ससून हॉस्पिटलच्या डस्टबिनमध्ये टाकण्यात आले आणि दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले. दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताच्या रिपोर्टवर डॉक्टरांनी या अपघाताच्या घटनेतील अल्पवयीन आरोपीचे नाव टाकून ते फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले होते”, अशी धक्कादायक माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
#WATCH | Pune car accident case | Pune Police Commissioner Amitesh Kumar says "Sections 120 (B), 467 Forgery and 201, 213, 214 Destruction of evidence have been added in this matter. We received the forensic report yesterday and it has been revealed that the sample collected at… pic.twitter.com/UdurvDuVyu
— ANI (@ANI) May 27, 2024
2 डॉक्टरांना अटक
या प्रकरणात आत्तापर्यंत ससून हॉस्पिटलमधील डॉ. श्रीहरी हलनोर आणि ससूनचे फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे एचओडी अजय तावरे यांना अटक करण्यात आली आहे. रक्ताच्या नमुन्यामध्ये अजय तावरे यांच्या सूचनेनुसार फेरफार करण्यात असल्याचे आढळून आहे”, अशी धक्कादायक माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Pune Crime Branch arrest two doctors in Porsche car crash case for manipulating blood samples
Read @ANI Story | https://t.co/R4tz4J5vH3#Pune #PuneCrimeBranch #carcrashcase pic.twitter.com/aFFiQwOpum
— ANI Digital (@ani_digital) May 27, 2024