Pune Porsche Accident: पुण्यात दारुच्या नशेत एका अल्पयीन मुलाने गाडी चालवून दोघांना उडवल्याची घटना घडली त्यांनतर या प्रकरणात रोज नवेनवे घडामोडी घडत आहेत. त्यात आज पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपी (Minor Accused)च्या ब्लड टेस्मटमध्ये फेरफार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी २ डॉक्टरांना अटक (Doctor Arrested)केली आहे. अजय तावरे असे एकाचे नाव आहे. अजय तावरे हा फॉरेन्सिक लॅबचा विभागप्रमुख आहे. काल रात्री पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची एक मिटींग पार पडली. या मिटींगमध्ये तावरे याला अटक करण्याचे निर्देश देण्यात आले. यानुसार सोमवारी लवकर कारवाई करत पुणे पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबचा विभागप्रमुख अजय तावरे सह अन्य एकाला अटक केली आहे. (हेही वाचा:Pune Porsche Accident: पोर्शे कार अपघात प्रकरणी रॅप सॉंगचा बनावट व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)