pune porsche accident PC TWITTER

Pune Porsche Accident: पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी सोशल मीडियावर रॅप सॉगचा बनावट व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओला असा दावा केला होता की, अपघातानंतर अल्पवयीन आरोपीने रॅप सॉंग गात शिवीगाळ करून व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यानंतर पुणे पोलिसांना याची पुष्ठी करत हा दावा खोटा असल्याचे सांगितले. पुणे पोलिसांनी रॅप सॉग व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाचा शोध घेतला आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला. (हेही वाचा- पुणे पोर्श कार अपघातातील अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक; चालकाने केली होती तक्रार)

मिळालेल्या माहितीनुसार, रॅप सॉगचा व्हिडिओ व्हायरल होताच, पुणे पोलिस यंत्रणा कामाला लागली. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आर्यन देव नीखरा नावाच्या इन्स्टाग्राम इन्फ्लुझरला ताब्यात घेतले. इन्स्टाग्राम वापरकर्ता  @cringistaan2 यावर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला. व्हिडिओत त्यांनी शिवीगाळ करत अपघाताबद्दल बोल होता. या व्हिडिओमुळे पोर्शे कार अपघात प्रकरण नवीन वळण घेत होते.

पुणे पोलिसांच्या सायबर सेलमध्ये आयपीसीच्या कलम 509, 294 बी आणि आयटी कायद्याच्या 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपीसह आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे.