भीमा कोरेगावर शौर्यदिन (Photo Credits-Facebook)

Bheema Koregaon Whatsapp Diktat: 1 जानेवारी 2018 मध्ये भीमा कोरेगाव (Bheema- Koregaon) लढाईला 200 वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर आता येत्या 1 जानेवारी 2020 दिवशी शौर्यदिन साजरा केला जाणार आहे. पण या पार्श्वभुमीवर पुणे पोलिसांकडून 250 व्हॉट्सअॅप ग्रुप्सना (Whatsapp Groups) नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. या दिवशी कोणत्याही प्रकारची अफवा पसरवणारी पोस्ट व्हायरल करु नये म्हणून खबरदारी घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 163 लोकांना भीमा कोरेगाव गाव बंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांची नावे आहेत. तर भीमा कोरेगाव मध्ये झालेल्या हिंसाचारानंतर या परिसरात कडक सुरक्षाव्यवस्था म्हणून सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ अभिवादन समारंभ येत्या 1 जानेवारीला पार पडणार आहे. त्यामुळेच या कार्यक्रमादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून व्हॉट्सअॅप ग्रुप्सना नोटीस आणि चार तालुक्यांमध्ये जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. तसेच व्हॉट्सअॅप ग्रुपवर कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाही याचे भान राखण्यास सांगण्यात आले आहे.(Bhima Koregaon Violence Case: भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिस घेणार अमेरिकेच्या FBI ची मदत) 

मात्र, 1 जानेवारी 2018 या दिवशी भीमा-कोरेगाव हिंसाचार घडला. त्यावरुन राजकारण तापले. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. अनेकांनी तत्कालीन आणि दुरगामी फायद्यातोट्यांसाठी या हिंसाचाराचा वापर केला. सांगितले जाते की, भीमा नदीतिरी झालेल्या या लढाईत ब्रिटशांचे सुमारे 2075 तर पेशव्यांचे सुमारे 600 सैनिक ठार झाले. पेशव्यांविरुद्धची लढाई ब्रिटीशांनी जिंकली. 1 जानेवारी 1818 च्या पहाटेला ही लढाई जिंकली गेली.