भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आरोपी वरावरा राव यांच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या हार्ड डिस्कमधील डाटा पुन्हा मिळवण्यासाठी आता पुणे पोलिस अमेरिकेतील ब्युरो (FBI)च्या मदतीने आता तपास करणार आहे. हार्ड डिस्कमधील डाटा पुन्हा मिळवण्यासाठी आता भारताची फॉरेंसिक विशेष टीम आणि पोलिस टीम लवकरच अमेरिकेला रवाना होणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पुणे ग्रामीण पोलिसांनी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आगामी शौर्य दिनादिवशी मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांच्यासोबत 163 लोकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. यंदा 1 जानेवारी दिवशी कोरेगाव भीमा लढाईचं 202 वं वर्ष आहे. तर हिंसाचाराला यंदा 2 वर्ष पूर्ण होणार आहेत. या सेलिब्रेशलापाहता आता पुणे पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था चोख केली आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण: शौर्य दिनाच्या दिवशी मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांच्यासह 163 जणांना जिल्हाबंदी.
दरम्यान 2 वर्षापूर्वी कोरेगाव भीमा लढाईला 200 वर्ष पूर्ण झाली त्याच्या आयोजित कार्यक्रमामध्ये भीमा-कोरेगाव या गावामध्ये हिंसक गोष्टी घडल्या त्यानंतर मार्च 2018 मध्ये मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांना अटकेत घेण्यात आले.
ANI Tweet
Bhima Koregaon violence case: Pune police to take help of the US based Federal Bureau of Investigation (FBI) to retrieve data from damaged hard disc recovered from Varavara Rao's house, an accused in the case. A team of India's forensic experts&police will soon travel to the USA.
— ANI (@ANI) December 26, 2019
दरम्यान 31 डिसेंबर 2017 दिवशी एल्गार परिषद झाली त्यानंतर 1 जानेवारी 2018 दिवशी भीमा कोरेगाव हिंसाचार झाला. त्यानंतर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपांमध्ये आनंद तेलतुंबडे यांना अटक करण्यात आली होती.