Pune Police Lathicharge on Followers of Osho: जगप्रसिद्ध असलेल्या पुणे येथील ओशो (Osho) आश्रमात मोठा राडा झाला आहे. पुणे येथील ओशो आश्रमात (Osho Ashram) जमलेल्या अनुयायांवर पुणे पोलिसांनी लाठीमार ( Lathi Charge on Followers of Osho) केला आहे. सुरुवातीला ओशो अनुयायी आणि पोलिस यांच्यात जोरदार वाद निर्माण झाला. त्यातून अनुयायी आक्रमक झाले. त्यांनी ओशो आश्रमाचे फाटक उघडून आत प्रवेश केला. त्यातून निर्माण झालेला गोंधळ नियंत्रणात आणण्यासाठी पुणे पोलिसांना लाठीमार करावा लागल्याचे समजते. ओशो आश्रमाच्या मालकीवरुन अनुयायांमध्ये प्रदीर्घ काळापासून वाद आहे. या वादाने आता अधिक आक्रमक रुप धारण केल्याचे पाहायला मिळत आहे.
ओशो आश्रम प्रशासन आणि ओशो अनुयायी यांच्यात पाठीमागील अनेक वर्षांपासून मोठा संघर्ष आहे. हा संघर्ष प्रदीर्घ काळापासून सुरु असला तरी, आजसारखी परिस्थीती यापूर्वी कधीच निर्माण झाली नव्हती. अश्रमात प्रथमच इतकी संघर्षाची स्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. संभाव्य परिस्थीती टाळण्यासाठी पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ओशो आश्रमाबाहेर तैनात आहे. पुण्यातील अश्रमात एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर ओशोंचे अनुयायी जमल्यामुळे परिस्थीती काहीशी तणावाची बनली. त्यातच ओशोंच्या आश्रमातील सुरक्षारक्षकांना डावलून अनुयायांनी आत प्रवेश केला. परिणामी पोलिसांना लाठीमार करावा लागला. (हेही वाचा, कोण आहेत 'मा आनंद शीला'? 'या' भूमिकेतून झळकणार प्रियांका चोप्रा)
आचार्य रजनीश ओशो यांचा काल 70 वा संबोधी दिन होता. या कार्यक्रमानिमित्त ओशोंचे जगभरातून लाखो अनुयायी पुणे येथे दाखल झाले आहेत. अनुयायांची ही संख्या सुमारे अडीच ते तीन हजार असावी असे सांगितले जात आहे. या सर्व अनुयायांनी पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ओशो आश्रम परिसरात हजेरी लावली. एकाच वेळी बहुसंख्येने अनुयायी एकत्र आले. त्यांनी सुरक्षा रक्षकांना डावलुन ओशो आश्रमात प्रवेश केला. परिणामी काही काळ गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले.
काही अनुयायांचे म्हणने असे की, ओशो आश्रम प्रशासनाकडून भ्रष्टाचार सुरु आहे. आश्रमाच्या संपत्तीवर प्रशासनाचा डोळा आहे. ओशोंच्या अनुयायांनाच आश्रमात येऊ दिले जात नाही. परिणामी आंदोलन करण्याशिवाय अनुयायांकडे कोणताही पर्याय नसल्याचे अनुयायीच सांगतात.