कोण आहेत 'मा आनंद शीला'? 'या' भूमिकेतून झळकणार प्रियांका चोप्रा
Priyana Chopra and Ma Anand Sheela (Photo Credits- Twitter)

अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyana Chopra) सध्या हॉलिवूड आणि बॉलिवूड मधील तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगमध्ये वस्त आहे. प्रियांकाने नुकत्याच एका टॉक शोमध्ये मुलाखत दिली आहे. त्यावेळी प्रियांकाने तिचा हॉलिवूडमधील आगामी चित्रपटाचा खुलासा केला आहे. परंतु सध्या प्रियांका 'एजेंट इट रोमँटिक' या चित्रपटासाठी काम करत आहे.

प्रियांकाने टॉक शोदरम्यान असे सांगितले की, प्रसिद्ध आणि वादग्रस्त गुरु ओशो (Osho) यांची शिष्या 'मा आनंद शीला' (Ma Anand Sheela) यांच्या भूमिकेतून झळकणार आहे. मा आनंद शीला यांचा जन्म भारतात झाला. परंतु त्या अमेरिकेच्या नागरिक होत्या. त्याचसोबत रजनीश ओशो यांच्या त्या एकेकाळी प्रव्यक्त्या होत्या. मात्र काही लोकांनी शीला यांच्यावर लोकांना मारहाण केल्याचा आरोप लावण्यात आला होता.

Osho And Ma Anand Sheela (Photo Credits- Twitter)

या चित्रपटाबद्दल सांगायचे झाल्यास, प्रियांका बॅरी लेविनसन यांच्यासोबत एका प्रोजेक्टसंबंधित बातचीत करत आहे. त्याचसोबत लेविनसन हे प्रख्यात अमेरिकन दिग्दर्शकसुद्धा आहेत. प्रियांकाचा आगामी चित्रपट हा भारतातील आध्यात्मिक गुरु ओशी यांची शिष्या मा आनंद शीला यांच्यावर आधारित असणार आहे. त्याचसोबत 90 मधील अभिनेत्रीच्या पेहरावामधील प्रियांकाचा लूक पाहण्यासारखा असणार आहे.