सविताभाभी पोस्टरमुळे 'अश्लील उद्योग मंडळ' निर्मात्यांना नोटीस, स्वामित्व हक्क कायद्याचा भंग केल्याचा आरोप
Savita Bhabhi Banner In Pune | (File Photo)

सविताभाभी (Savita Bhabhi) सांगा कोणाची? असा सवाल थेट न्यायालयात पोहोचला आहे. 'अश्लिल उद्योग मंडळ' (Ashleel Udyog Mitra Mandal) चित्रपटाच्या जाहिरातीसाठी 'सविता भाभी... तू इथंच थांब' असे पोस्टर्स पुणे (Pune) शहरभर झळकले होते. या पोस्टर्सनी पुणेकरांची उत्सुकता वाढवली आणि माना वळवल्या असल्या तरी जाहीरातीसाठी वापरण्यात आलेल्या हा फंडा नावामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडाला आहे. सविताभाभी हे कॉमिक कॅरेक्टर असून, त्यावर निलेश गुप्ता नामक व्यक्तीने दावा सांगितला आहे. सविताभाभी या पात्राचे स्वामित्व हक्क राखीव आहेत. त्यामुळे त्याचा वापर करण्याबाबत स्वामित्व हक्क मालकाची पूर्वपरवानगी न घेताच वापर केल्याबद्दल निलेश गुप्ता यांनी संबंधित चंत्रपट निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे.

सविताभाभी ही हे एक पॉर्न कॉमिक कॅरेक्टर म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या नावाचे पोस्टर्स शहरभर झळकल्यामुळे पुण्यात जोरदार चर्चा रंगली होती. आता पोस्टरच्या माध्यमातून शहरभर वावरणारी ही सविताभाभी आहे तरी कोण? असा प्रश्न विचारला जात होता. काही काही कालावधीनंतर याचा खुलासा झाला की, हे पोस्टर म्हणजे 'अश्लिल उद्योग मंडळ' नामक चित्रपटाची जाहीरात आहे.

सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेल्या ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटात अभिनेत्री पर्ण पेठे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर मराठीतील बोल्ड अभेनेत्री सई ताम्हणकर हीसुद्धा या चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सायली पाठक, अक्षय टांकसाळे, ऋतुराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके हे चेहरेही या चित्रपटात दिसणार आहेत. अभिनेता अलोक राजवाडे याने या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर्स नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. पोस्टरही नावाप्रमाणेच भूवया उंचावणारे आणि उत्सुकता ताणून धरणारे असल्याने प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती. (हेही वाचा, 'सविता भाभी... तू इथंच थांब', पुणे येथील होर्डिंग्जमागे ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’)

दरम्यान, पुण्यात अशी पोस्टर झळकण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. या आधीही पिंपरी चिंचवड (पुणे) परिसरात ‘शिवडे आय एम सॉरी!’ आणि 'सुंदर बायका साडी कुठून खरेदी करतात' या होर्डिंग्सनीही जोरदार धमाल उडवून दिली होती. पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर, वाकड, रहाटणी परिसरात ‘शिवडे आय एम सॉरी!’ चे एक दोन नव्हे तर तब्बल 300 पोस्टर्स झळकले होते. ज्यामुळे अनेकांच्या नजरा पोस्टर्सवर स्थिरावल्या होत्या. त्यानतर अलिकडेच झळकलेल्या 'सविताभाभी' पोस्टर्सनेही अनेकांना धक्का दिला होता.