Ashleel Udyog Mitra Mandal | (Photo Credit: Instagram/parnapeace)

'सविता भाभी... तू इथंच थांब' (Savita Bhabhi Hoardings) हे वाचता वाचता तिथेच थांबून या होर्डिग्जची चर्चा करणाऱ्या पुणेकरांना अखेर या सर्व प्रकरणाचा उलघडा झाला आहे. तसेच, हे होर्डिंग्ज पाहून 'हा काय अचरटपणा?' असे म्हणणाऱ्या पुणेकरांनी प्रकरणाचा उलघडा झाल्याबद्दळ 'हुश्य...!' म्हणत सुस्कारा सोडला आहे. तर दुसऱ्या बाजूला कल्पक पुणेकरांनी मात्र या होर्डिंग्जचे जोरदार स्वागत केले आहे. हे होर्डिंग कोणी प्रेमवीर अथवा कोणा व्यावसायिक कंपनीने झळकवले नाही. तर, या होर्डिंग्जमध्ये ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ (Ashleel Udyog Mitra Mandal) असल्याचे पुढे आले आहे. आता तुम्ही म्हणाल हे ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ कोण?

तर मंडळी हे ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ ही कोणती संस्था, संघटना नाही बरं! हा एक चित्रपट आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीच पुणे शहरभर 'सविता भाभी... तू इथंच थांब' हे होर्डिंग्ज इथेल लावण्यात आले होते. दरम्यान, आगोदर या काहीशा विचित्र मजकूराच्या होर्डिंग्जने शहरभर चर्चा झाली. अनेकांच्या भूवया उंचावल्या. त्यानंतर आता ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटाचीही जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच्या नावातच जर 'अश्लिल' असा उल्लेख आहे. तर प्रत्यक्षात चित्रपट कसा असेल अशी उगाचच उत्सुकताही काही मंडळींनी वर्तवली आहे. तर, सोशल मीडियावरही या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे.

दरम्यान, ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ हे नाव जरी अनेकांच्या भूवया उंचावयास लावत असले आणि नावावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असले तरी, प्रत्यक्षात चित्रपटात काय दाखवले आहे हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजणार आहे. तसेच, या चित्रपटास प्रेक्षकांचाही प्रतिसाद कसा मिळतो याबाबत उत्सुकता आहे. येत्या 6 मार्च 2020 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (हेही वाचा, सविता भाभी... तू इथंच थांब! पुण्याच्या चौकात झळकले नवे पोस्टर; शहरभर चर्चेला उधान)

पर्ण इन्स्टाग्राम पेज पोस्ट

 

View this post on Instagram

 

टीझर उद्या येतोय! #AUMM #6March #HandiFutnar #teaserouttomorrow

A post shared by parna (@parnapeace) on

सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेल्या ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटात अभिनेत्री पर्ण पेठे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर मराठीतील बोल्ड अभेनेत्री सई ताम्हणकर हीसुद्धा या चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सायली पाठक, अक्षय टांकसाळे, ऋतुराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके हे चेहरेही या चित्रपटात दिसणार आहेत. अभिनेता अलोक राजवाडे याने या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर्स नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. पोस्टरही नावाप्रमाणेच भूवया उंचावणारे आणि उत्सुकता ताणून धरणारे असल्याने प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. लवकरच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षणांच्या भेटीला येणार आहे.