सविता भाभी... तू इथंच थांब! पुण्याच्या चौकात झळकले नवे पोस्टर; शहरभर चर्चेला उधान
Savita Bhabhi Banner In Pune (PC- संग्रहित संपादित प्रतिमा)

पुणेरी पाट्या हा नेहमीचं चर्चेचा विषय ठरला आहे. 'पुणे तिथे काय उणे' असं नेहमी म्हटलं जात. पुण्यात म्हात्रे पूल आणि नीलायम ब्रिजजवळ लागलेल्या भल्या मोठ्या होर्डिंग्सची शहरभरात जोरदार चर्चा सुरू आहे. या होर्डिंगवर 'सविता भाभी तू इथंच थांब!!' (Savita Bhabhi Banner) या आशयाचा मजकूर लिहण्यात आला आहे. हे पोस्टर पाहून पुणेकरांचे पाय थांबले आहेत. मात्र, होर्डिंगवर उल्लेख केलेल्या सविताभाभी नेमक्या कोण? आहेत हे अद्याप समजू शकलेलं नाही. काही दिवसांपूर्वी पुण्यात 'शिवडे आय एम सॉरी' अशा आशयाचे पोस्टर झळकले होते.

'सविता भाभी तू इथंच थांब!!' या आशयाचा मजकूर असलेले हे पोस्टर पुण्यातील सर्व मुख्य रस्त्यांवर आणि चौकांमध्ये लावण्यात आले आहेत. या होर्डिंग्जच्या ब्लॅक बॅकग्राऊंडवर पिवळ्या अक्षरात 'सविता भाभी... तू इथंच थांब' असं लिहण्यात आलं आहे. हे होर्डिंग्ज पाहिल्यानंतर पुणेकरांना हसू आवरणे अशक्य झालं आहे. (हेही वाचा - 10 years of German Bakery Blast: पुण्यातील जर्मन बेकरी दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण; अजूनही फरार आहेत आरोपी)

पुण्यातील पिंपरी भागात यापूर्वी 'स्मार्ट बायका कुठे जातात' असा फ्लेक्स व्हायरल झाला होता. त्यावेळी संबंधित फ्लेक्स लावणाऱ्या दुकानदाराने माफी मागितली होती. मात्र, 'सविता भाभी तू इथंच थांब!!' हे पोस्टर लावणाऱ्याचा अद्याप कोणताही शोध लागलेला नाही. काही पुणेकरांच्या मते ही जाहिरात असावी किंवा कोणीतरी प्रसिद्धीसाठी हा सर्व प्रकार करत असल्याचे म्हटलं जात आहे.