Pune Nagar Highway Close on 1st January: कोरेगाव भीमा शौर्यदिनानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभुमीवर काही नियम लागू करण्यात आले आहेत. तसेच विजयस्तंभाच्या येथे नागरिकांनी गर्दी करु नये असे आवाहन ही करण्यात आले आहे. याच दरम्यान आता कोरेगाव भीमा शौर्यदिनाच्या पार्श्वभुमीवर पुणे-नगर महामार्ग प्रवाशांसाठी 1 जानेवारील बंद राहणार आहे. या संदर्भात पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार पुणे-नगर महामार्ग हा 31 जानेवारीच्या संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते 1 जानेवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.(Elgar Parishad Event: एल्गार परिषदेच्या कार्यक्रमासाठी परवानगी नाही, पुणे पोलिसांचा निर्णय)
कोरेगाव भीमा शौर्यदिन येत्या 1 जानेवारीला साजरा केला जातो. याच पार्श्वभुमीवर एल्गार परिषदेने कार्यक्रमासाठी 31 डिसेंबर रोजी परवानगी मागितली होती. परंतु पुणे पोलिसांनी या एल्गार परिषदेला परवानगी नाकारली आहे. काही कार्यकर्त्यांनी एल्गार परिषदेसाठी परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला होता. पण काही कार्यकर्त्यांनी घरुनच या कार्यक्रमात सहभागी होण्याचे ठरवले आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभाला येण्यापूर्वी ज्यांच्याकडे पास असणार त्यांनाच तेथे येण्याची परवानगी दिली जाणार आहे. तर सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
तर येत्या 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता भिख्खू संघाच्या उपस्थितीत धम्म वंदना केली जाणार आहे. तसेच 1 जानेवारी 2021 रोजील धम्मदेसना बुद्ध वंदना, मान्यवरांकडून वियस्तंभाला अभिनवाद केले जाणार आहे. हा एकूणच कार्यक्रम दुपारी 12 वाजेपर्यंत होणार आहे.(एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा प्रकरणाचा संबंध नाही- शरद पवार)
दरम्यान, पुण्यापासून साधारण 40 किलोमीटर दूर असलेल्या कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 या दिवशी दलित समूहाने एक कार्यक्रम आयोजित केला होता. याला काही संघटनांचा विरोध होता. दरम्यान, तत्पूर्वी पुणे येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचा संबंध सुद्धा या घटनेशी लावला जात आहे. उडालेल्या दंगलीत अनेक लोक जखमी झाले होते.