Pune-Mumbai Train Route: पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक ठप्प, दरड कोसळ्यानं पुणे-मुंबई रेल्वे वाहतूकीवर मोठा परिणाम
Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

आज सकाळ पासून पुणे मुंबई या रेल्वे (Pune-Mumbai Train Route) वाहतूक ठप्प झालेली आहे. पुणे (Pune)-मुंबई (Mumbai) या लोहमार्गावर दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतूकीवर परिणाम झाला आहे. हवामान विभागाकडून (IMD) पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असुन काल रात्री पासुनच जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. परिणामी काल रात्री मंकीहील (Monkey Hill) ते ठाकूरवाडी (Thakurwadi) दरम्यान लोहमार्गावर दरड कोसळली. अप लाईनवर ही दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा बंद आहे. अप लाईनवरील (Up Line) वाहतूक मिडल लाईनकडे (Middle Line) वळविण्यात आल्यानं रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे. लोहमार्गावरील दरड हटविण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र अप लाईन पूर्व पदावर येण्यासाठी बराच अवधी लागणार आहे.

 

आज पुणे स्टेशनहून (Pune Station) मुंबईच्या दिशेने सुटणाऱ्या डेक्कन क्वीन एक्सप्रेस (Deccan Queen Express), सिंहगड एक्सप्रेस (Sinhgadh Express), नांदेड पनवेल एक्सप्रेस (Nanded Panvel express), प्रगती एक्सप्रेस (Pragati Express) या गाड्यावर रेल्वे वाहतूक खोळंबल्याचा परिणाम दिसून आला. लोहमार्गावर दरड कोसळून बोल्डर (Bolder Pole) आणि ओएचईचा खांब (OHE Pole) पडल्यानं रेल्वे वाहतूक ठप्प झाली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तरी मुंबई पुणे या मार्गावार मात्र दरड कोसळल्याचा कुठलाही परिणाम पडलेला नाही. मुंबई पुणे या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत सुरु आहे. (हे ही वाचा:- Maharashtra Rains: पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज तर राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची हजेरी)

 

रेल्वे प्रशासनाकडून या घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तरी पुणे मुंबई या मार्गावर रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी ही विशेष माहिती देण्यात आली आहे. लोहमार्गावरील दरड हटविण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असलं तरी पुन्हा रेल्वे वाहतूक सुरळीत कधी सुरु होणार या बाबतची कुठलीही माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.