धनंजय मुंडे यांच्या पुणे येथील फ्लॅटवर कारवाई, बँकेचे कर्ज थकवल्याने जप्ती
धनंजय मुंडे(Edited and archived images)

राष्ट्रवादी पक्षाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde)  यांना विधानसभा निवडणूकीत यश आले. पण त्यांच्या मागील अडचणी काही थांबल्यान नसून आता पुण्यातील त्यांच्या फ्लॅटवर कारवाई करण्यात आली आहे. कारण मुंडे यांनी त्या फ्लॅटसाठी बँकेकडून कर्ज घेतले होते मात्र ते अद्याप फेडले नसल्याने त्यावर जप्ती आली आहे. तर शिवाजीराव भोसले कॉपरेटिव्ह बँक यांच्याकडून रक्कम कर्जासाठी घेतली होती. ती रक्कम जवळजवळ 1 कोटी 43 लाख रुपयांच्या घरात आहे.

बँकेने एका जाहिरातीमधून मुंडे यांचा फ्लॅट ताब्यात घेतला असल्याचे झळकवले होते. मात्र त्यावर धनंजय मुंडे यांनी हे राजकीय षडयंत्र असल्याचे म्हणत आरोप केला आहे. तर गेल्या काही दिवसांपासून निवडणूकीच्या कामत व्यस्त असल्याने निवडणूकीनंतर घराचे संपूर्ण पैसे देऊ करीन असे बँकेला कळवले होते असे म्हटले आहे. बँकेवर राष्ट्रवादीच्याच आमदारांचे चालत होते. मात्र बुडीत कर्ज वाढवल्याने आरबीआयकडून बँकेला सुचना देत त्यांच्यावर निर्बंध लादले. तसेच नव्या बँक प्रशासकांनी नेमणूक सुद्धा करण्यात आली आहे. (महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 निकाल: धनंजय मुंडे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह पहा 288 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी) 

मात्र मुंडे यांनी बँकेच्या कर्जाची रक्कम परफेड करण्याची नोटीस मिळाली होती. तर 30 ऑक्टोबरनंतर कर्जफेड करणार असल्याचे बँकेला सांगितल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. परंतु तरी सुद्धा बँकेने कारवाई केली असून तो फ्लॅट ताब्यात घेतला आहे. तर बँकेचे माजी प्रशासक भोसले आणि मी जुने मित्र आहोत. पण मी माझ्या वाट्याची रक्कम भरली, पण अनिल भोसले यांनी त्यांना असलेल्या काही आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या वाट्याची रक्कम भरली नसल्याचे मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.