Pune Crime News: प्रसिध्द सराफ व्यावसायिकावर पुण्यात गोळीबार, लाखो करोडोचं सोन लुटलं
gun shot representative image

Pune Crime News: पुण्यात एका प्रसिध्द सराफा व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उभारण्यात आला आहे.या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील वानवडी भागातील बी.टी वकडे रोडवर ही गोळीबार करण्यात आली आहे. गोळीबार केल्यानंतर व्यावसायिकाकडील लाखो करोडोचं सोनं लुटून नेल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेत सराफा व्यावसायिक गंभीर जखमी झाला अशी माहिती पोलिसांनी दिली.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक मदनलाल ओसवाल असं नाव असलेल्या व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. प्रतिक वडिलांसोबत दुचाकीवरून जात होता तेव्हा ही घटना घडली. दुचाकीवरून पुण्यातील क्रोम मॉल चौकापासून बी.टी कवडे रोड कडे जात असताना रस्त्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. ही घटना बुधवारच्या रात्री ९ वाजून ३- मिनीटांनी दुचाकीवरून आलेल्या ३ जणांनी गोळी झाडली. घटनेत प्रतिकला तोंडावर आणि मांडीत गोळी लागली आणि तो जखमी झाला.

गोळीबारच्या आवाजाने रस्त्यावर मोठा गोंधळ पसरला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.  पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी तपास सुरु केला. प्रतिकला रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा गोळीबार कोणी केला याचा शोध घेण्यात येत आहे. अद्याप हल्लेखोरांची ओळख पटली नाही.दुकानातून प्रतिक सोनं घेऊन निघाल होता.  प्रथमदर्शींनी सांगितल्या प्रमाणे प्रतिककडे असलेले लाखो करोडोचे सोनं हल्लेखोर घेऊन फरार झाले आहे.