Kill | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Husband Wife Relationship: घरातील शिलाई मशीनच्या धारधार, टोकदार कात्रीने (Scissors) भोसकून आणि गळ्यावर वार करुन महिलेची अत्यंत निर्घृण हत्या (Wife Murder) करण्यात आली आहे. पुणे येथील खराडी परिसरात बुधवारी (22 जानेवारी) पहाटे साडेचार वाजनेच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्योती शिवदास गिते (वय-28, रा. लेन क्र.5 तुळजाभवानी नगर, खराडी) असे मृत महिलेचे तर शिवदास तिकाराम गीते (वय 37 वर्षे) असे हत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. शिवदास आणि ज्योती हे पतीपत्नी असून, एकत्र राहतात आणि त्यांना एक अपत्यही आहेत. अत्यंत किरकोळ कारणावरुन सुरु झालेला वाद विकोपाला गेला आणि कोर्टात स्टेनो म्हणून काम करणाऱ्या पती शिवदास याने पत्नीची हत्या केली. धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर त्याने हा सर्व प्रकार व्हिडिओतही चित्रित केला.

पुणे शहर गुन्हेगारी घटनांसाठी चर्चेत

पाठिमागील काही दिवसांपासून पुणे शहर गुन्हेगारी घटनांसाठी विशेष चर्चेत आहे. चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवदास गिते यास अटक करण्यात आली आहे. तो मुळचा बीड येथील रहिवासी आहे. पुणे कोर्टात तो स्टेनो पदावर नोकरीस आहे आणि तुळजाभवानी परिसरात पत्नी आणि मुलासोबत वास्तव्यास आहे. दोघांमध्ये पाठिमागील काही दिवसांपासून किरकोळ कारणावरुन वाद सुरु होते. घटना घडली त्या दिवशी बुधवारी पहाटे देखील त्यांच्यात काही कारणावरुन वाद झाला. ज्यातून पती शिवदास याने अत्यंत टोकाचे पाऊल उचलले आणि पत्नीची हत्या केली. (हेही वाचा, Wife Body Chopped and Boiled: पत्नीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवले; Telangana मधील धक्कादायक घटना)

'माझी लक्ष्मी होती ती'

घटनेनंतर आरोपीने व्हिडिओ चित्रीत केला आहे. जो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, आरोपी शिवदास गिते हा आपली बाजू मांडताना दिसतो आहे. पाठिमागे ज्योती रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे. आरोपी शिवदास म्हणतो आहे की, ही माझ्यासाठी लक्ष्मी होती. खर तर मला हिला मारायचं नव्हतं. माझी ती इच्छाही नव्हती. पण तिनेच मला मारण्याचा प्रयत्न केला. मला हे फार उशीरा कळलं.. त्यामुळे मी तरी काय करणार.. मी सुद्धा एक माणूसच आहे. माझ्या सुरक्षेसाठी मला हे वाईट करण्याची वेळ आली. एका मुलाला जन्म दिला आहे हिनं.. आई व्हायचं भाग्य मिळालंय हिला.पण काय करणार..' , असे काहीसे सांगताना व्हिडिओत पाहायला मिळते. (हेही वाचा: Malabar Hill Murder Case: चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या; मुंबईतील मलबार हिल परिसरातील घटना)

दरम्यान, पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे आणि पत्नी ज्योती हिचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला ज्योती हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा आहे.