भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण: पुणे कोर्टाने वरावरा राव यांना अंतरिम जामीन नाकारला
Varavara Rao (Photo Credits: Twitter/ ANI)

1 जानेवारी 2018 दिवशी पुण्याच्या भीमा कोरेगाव (Bhima Koregaon Case) भागात झालेल्या हिंसाचार प्रकरणी आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी येरवडा तुरूंगात असलेल्या वरावरा राव (Varavara Rao) यांना न्यायालयाने अंतरिम जामीन (Temporary Bail) देण्यास नकार दिला आहे. राव यांच्या मेव्हणीच्या मृत्यूनंतर काही विधींमध्ये सहभागी होण्यासाठी वरावरा राव यांनी जामीन मागितला होता मात्र तो नाकारण्यात आला आहे.

वरावरा राव यांना जामीन नामंजूर

वरावरा यांनी 29 एप्रिल ते 4 मे या काळासाठी जामीन मागितला होता. मात्र तो फेटाळण्यात आला आहे. जामीन मिळाल्यास ते फरार होऊ शकतात या भीतीने हा जामीन नाकारण्यात आला आहे.

वरावरा राव यांच्यासोबत सुधा भारद्वाज,अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलाखा यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यात आयोजित एल्गार परिषदेमध्ये काही बेकायदेशीर हालचाली केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे.