महाराष्ट्रात 31 ऑगस्ट पासून पुढील 10 दिवस गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) साजरा केला जाणार आहे. या दहा दिवसांमध्ये कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे. पुण्यामध्ये 31 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्था मोडू नये यासाठी 5 दिवसांची मद्य विक्री बंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गणेशोत्सवाच्या या 5 दिवसांच्या काळात मद्य विक्रीची दुकाने, परमीट रूम आणि बिअर बार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून काही ठिकाणी वाहतूक सेवेतही बदल करण्यात आला आहे. काही रस्त्यांवर पर्यायी रस्ते खुले करून देण्यात आले आहे. हे देखील नक्की वाचा: Ganeshotsav 2022 Pune: कसबा ते केसरीवाडा; पहा यंदा ढोल ताशांच्या गजरात मानाच्या गणपतींची किती वाजता होणार प्राणप्रतिष्ठा.
पुण्यात कोणत्या 5 दिवशी मद्य विक्री बंदी?
31 ऑगस्ट म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी पुण्यात मद्य विक्री असणार आहे. विसर्जनाच्या दिवशी पाचव्या आणि सातव्या दिवशी गणेश विसर्जनाला अप्रिय घटना टाळण्यासाठी मद्य विक्री बंद असणार आहे. तसेच अनंत चतुर्दशीच्या वेळेस 9 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबरला विसर्जन पूर्ण होईपर्यंत ही मद्य विक्री कायम राहणार आहे. पुणे महापालिका क्षेत्रातील मिरवणुकीच्या मार्गावर मद्य विक्रीची दुकाने, परमीट रूम आणि बिअर बार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत.
दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात जिल्हाधिकार्यांकडून देण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित विक्रेत्यांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.