पुण्यातील मानाचे पाच गणपती (संग्रहित-संपादित प्रतिमा)

लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये समाजात प्रबोधन करण्यासाठी आणि लोकांना एकत्र ठेवण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली. पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. त्यामध्येही मानाच्या पाच गणपतींना विशेष स्थान आहे. यंदा कोविड निर्बंधमुक्त वातावरणामध्ये पुण्याच्या मानाच्या पाचही गणपतींचं आगमन आणि प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे जाणून घ्या 31 ऑगस्ट दिवशी नेमकी कधी होणार कोणत्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा?

गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भाविकांना बाप्पाचे दर्शन खुले होते त्यामुळे कसबा ते केसरीवाडा या मानाच्या 5 गणपतींपाठोपाठ पुण्यात खास आकर्षण असलेल्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचेही दर्शन भाविकांना खुले होणार आहे. नक्की वाचा: Ganesh Chaturthi Pranpatishtha Puja: गणेश चतुर्थीला गुरूजींशिवाय गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा कशी कराल? जाणून घ्या पूजा विधी.

कसबा पेठ

यंदा भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या सन्मानार्थ

देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मांना हा गणेशोत्सव सोहळ्या अर्पण करत हुतात्मा राजगुरु यांचे नातू धैर्यशील आणि सत्यशील यांच्या हस्ते कसबा पेठच्या गणरायाची प्राणप्रतिष्ठापना 11 वाजून 37 मिनिटांनी होणार आहे.

तांबडी जोगेश्वरी

पुण्याच्या तांबडी जोगेश्वरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा दुपारच्या सुमारास होईल. सकाळी 10.30 वाजता ढोल ताशाच्या गजरात त्याचा आगमन सोहळा सुरू होणार आहे.

गुरूजी तालीम

गुरूजी तालिमच्या बाप्पाची मिरवणूक 10 वाजता सुरू होणार असून दुपारी अडीजच्या सुमारास प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.

तुळशीबाग

तुळशीबागच्या गणपतीची देखील 10.30 च्या सुमारास मिरवणूक सुरू होणार असून 2 वाजून 20 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठा होईल.

केसरीवाडा

केसरीवाडा गणपतीची प्राणप्रतिष्ठा 10.30 च्या सुमारास होणार आहे.

नक्की वाचा: Gauri-Ganpati 2022 Pujan Timings: यंदा 31 ऑगस्टला गणेश पूजनाची आणि 4 सप्टेंबरला गौरी पूजनाची शुभ मुहूर्त वेळ काय?

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा 11.37 वाजता होणार आहे. तर पुण्यात भाऊसाहेब रंगारी गणपतीची प्राणप्रतिष्ठा दुपारी 12:30 च्या सुमारास मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे