Pune Chandni Chowk Bridge | Photo Credit - Twitter

चुकीच्या शहर नियोजनामुळे होणाऱ्या वाहतुक कोंडीवर पर्याय म्हणून पुणे येथील चांदणी चौकातील पूल (Pune Chandni Chowk Bridge Update) अखेर पाडण्यात आला. रविवारी (2 ऑक्टोबर) रात्री 1 वाजून 7 मिनीटांनी हा पूल पाडण्यात आला. प्रशासनाने आगोदरच दिलेल्या माहितीनुसार, पुल पाडण्यासाठी स्फोटकांचा वापर करण्यात आला. पुल पडताच परिसरात धुळीचे लोट आकाशात उडाले होते. पुढचे काही मिनिटे धुळीचे लोट आकाशात दिसत होते. दरम्यान, धुळ खाली बसली असली तरी मातीचा ढिगारा अद्यापही जागेवरच आहे. तो हटविण्यासाठी काम प्रगतिपथावर आहे. दरम्यान, नागरिकांना वाहतुकीसाठी आणि दळणवळणासाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करुन देण्यात आली आहे. तुम्ही जर चांदणी चौक मार्गे जाण्याचा विचार करत असाल तर, पर्यायी मार्ग जाणून घ्या.

वाहतुकीतील बदल-

  • उर्से टोल नाका- मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडून येणारी जड वाहने थांबवली जातील.
  • खेड शिवापूर टोल नाका- साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने येणारी वाहने थांबविण्यात येतील.
  • शिंदेवाडी ते ऊर्से टोलनाका- मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिंदेवाडी ते उर्से टोल नाका
  • दरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या जड वाहनांना वाहतुकीस बंदी
  • डुक्कर खिंड ते घोडावत चौक- मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर डुक्कर खिंड ते घोडावत चौक (पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्द) या काळात सर्व बाजूची वाहने वाहतुकीसाठी बंद. (हेही वाचा, Chandni Chowk Bridge Demolished: 1300 छिद्रांमध्ये 600 किलो बारूद भरून अखेर चांदणी चौक पूल जमीनदोस्त, पहा व्हिडीओ)

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

    • मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या हलक्या आणि प्रवासी चारचाकी वाहनांसाठी दिलेल्या पर्यायी मार्गानुसार मुंबईच्या दिशेने येणारी हलकी प्रवासी वाहने उर्से टोलनाक्यावरुन पुढील मार्गावरुन प्रवास करु शकतात. नाशिक फाटा, बोपोडी चौक, इंजिनीअरींग कॉलेज चौक, संचेती चौक, खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पूल डावीकडे वळून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेने.

ट्विट

    • वाकड चौकात आल्यानंतर डाव्या बाजूला वळुन राजीव गांधी पुलावरुन पुढे विद्यापीठ चौक, संचेती चौकाच्या दिशेने वळून खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे आपण साताऱ्याच्या दिशेने जाऊ शकता. शिवाय कात्रज चौक, नवले पुल डावीकडे वळून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरुनही आपण प्रवास करु शकतात.

ट्विट

  • तुम्ही जर राधा चौकाकडे आला असाल तर डावीकडे वळून आपण बाणेर रस्त्यावरुन विद्यापीठ चौकाकडून उजव्या बाजूने संचेती चौकाच्या दिशेने उजवीकडे वळून खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याच्या दिशेने अथवा कात्रज चौक, नवले पूल डावीकडे वळून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करु शकता.

ट्विट

पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी पुलाला सुमारे 1 हजार 300 छिद्र पाडण्यात आली. या सर्व छिद्रांमध्ये मिळून 600 किलो स्फोटकं भरली गेली. पाठिमागील काही दिवसांपासून हा पूल पाढण्यासाठी सर्व सुरक्षा आणि कायदेशिर नियमांचे पालन करुन तयारी करण्यात येत होती. अखेर हा पूल पाढण्यात आला.