चीनच्या वुहान शहरामध्ये उत्पत्ती झालेला कोरोना व्हायरस आता जगभर 180 देशांमध्ये झपाट्याने वाढत आहे. दरम्यान यात दिवसागणिक रूग्णांची आणि उपचाराअभावी मृत्यूमुखी पडणार्यांचा आकडा भयावह आहे. अद्याप कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे होणार्या COVID 19 या आजारावर ठोस औषध नाही. मात्र पुण्यामध्ये Mylab Discovery Solutions Pvt Ltd कंपनीने पहिली स्वदेशी बनावटीची टेस्ट किट बनवली आहे. दरम्यान यामुळे कोरोना संसर्गाचं निदान वेगाने होण्यास मदत होणार आहे. लवकरच CDSCO कडून कमर्शिअल मंजुरी देखील मिळणार आहे. हे स्वदेशी बनावटी टेस्ट किट WHO आणि CDC च्या नियमावलीनुसारच बनवण्यात आलं आहे. सध्या भारताला टेस्ट किट परदेशातून आयात करावं लागत आहे. मात्र स्वदेशी बनावटीचं किट बाजारात आल्यास पैशांची बचत होणार आहे सोबतच टेस्ट करून निदानाचा वेळही वाढणार आहे. Coronavirus उपचारासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजने उभारले पहिले स्वतंत्र रुग्णालयीन कक्ष; मास्क निर्मिती, अन्न पुरवठा सहित 'या' सुविधा सुद्धा केल्या सुरु.
Mylab च्या COVID-19 टेस्ट किट्सच्या स्क्रीनवर सुमारे अडीच तासामध्ये चाचणीचा निकाल मिळू शकतो. सध्या भारतातील अनेक टेस्ट लॅबमध्ये निकाल हाती येण्यास सुमारे 7 तासांचा वेळ लागत आहे. तर स्वदेशी बनावटीच्या किटची किंमत देखील सध्याच्या किटपेक्षा 1/4 पट स्वस्त आहे. पुणे: Serum Institute of India आणि अमेरिकेच्या Codagenix द्वारा कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी नवी लस विकसित करण्याच्या प्रयत्नांना यश.