Pune Lohegaon Airport 1 डिसेंबर पासून पूर्ण क्षमतेने खुलं होणार; रनवे चं काम अंतिम टप्प्यात
Representational Image (Photo Credits: ANI)

पुण्याच्या लोहगाव एअरपोर्ट (Pune Lohegaon Airport) वर रन वे चं काम आता अंतिम टप्प्यात आल्याने लवकरच हे विमानतळ पूर्ण क्षमतेने पुणेकर प्रवाशांसाठी खुलं होत असल्याची माहिती समोर आली आहे. या एअरपोर्टच्या रनवेच्या डागडुजीचं काम सुरू होते. आता ते जवळपास संपल्यात जमा असल्याने 1 डिसेंबरपासून या विमानतळावरून 24 तास उड्डाणं शक्य होणार आहे. अशा विश्वास एअरपोर्ट अथॉरिटीला आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील ट्वीट करत याची माहिती दिली आहे. पुणे विमानतळ सध्या 8 ते 8 असे 12 तास खुले आहे. हे प्रवाशांसाठी गैरसोयीचे आहे. पुणे विमानतळातील धावपट्टीचे काम आता पूर्ण झाले असून येत्या 1 डिसेंबरपासून पुणे विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी पूर्णवेळ उपलब्ध होत आहे. असे म्हटलं आहे. नक्की वाचा: Pune Airport Update: पुणे एअरपोर्ट रनवेच्या पुनरुत्थानाच्या कामांमुळे 16-29 ऑक्टोबर दरम्यान बंद राहणार.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ ट्वीट

पुणे एअरपोर्टच्या रनवे चं काम 2020 च्या अंतिम तिमाही पासून सुरू झाले आहे. पुणे एअरपोर्टचा रनवे 2530 मीटरचा आहे. पुणे रनवे 14 दिवस बंद होता त्यानंतर तो 12 तासांसाठी खुला करण्यात आला. अद्यापही आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी नागरिकांना जानेवारी 2022 पर्यंत वाट पहावी लागणार असल्याची माहिती हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तामध्ये एअरपोर्ट अधिकार्‍यांनी दिली आहे. लॉकडाऊन पूर्वी दुबई ते पुणे अशा 2 फ्लाईट्स सुरू होत्या पण आता अद्याप कोणत्याही एअरलाईन्स कडून माहिती देण्यात आलेली नाही.