Pune Airport: लोहगाव विमानतळावरील धावपट्टी दुरुस्तीच्या कामांमुळे (Runway Resurfacing Work) एप्रिल आणि मे 2021 मध्ये 14 दिवस विमानसेवा बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, 26 एप्रिल 2021 ते 9 मे 2021 या काळात विमानतळ पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या विमानतळावरील धावपट्टी दुरुस्तीचे काम गेल्या वर्षी 26 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आले होते. हे काम दररोज रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत सुरु आहे. त्यामुळे सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत या विमानतळावरील विमानसेवा सुरु आहेत.
नुकतेत पुणे विमानतळ प्रशासनाने एक ट्विट केले आहे. ज्यात येत्या 26 एप्रिलपासून 9 मे पर्यंत विमानतळावरून एकाही विमानाची उड्डाण होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाकडून ही माहिती देण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. पुणे विमानतळावरून सध्या दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई, बंगळरू, नागपूर, कोची, लखनऊ, हैदराबाद, आदी शहरांमध्ये ये-जा सुरु आहे. हे देखील वाचा- Mumbai Local Trains: मुंबई लोकलमधून 'या' वेळेत प्रवास केल्यास सर्वसामान्य नागरिकांना भरावा लागेल इतका दंड
ट्विट-
As per information received from Indian Air Force (IAF), due to runway resurfacing works, Pune Airport will have no flight operations for 14 days from 26th April 2021 till 09 May 2021: Pune Airport. #Maharashtra
— ANI (@ANI) January 31, 2021
दरम्यान, विमानतळ बंद असल्याने विमान प्रवाशांना या कालावधीतील प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहेत. तसेच या प्रवाशांना आता मुंबई विमानतळाचा पर्याय निवडावा लागणार आहे. त्यामुळे मुंबई- पुणे दरम्यानचा प्रवास वाहनाने करावा लागणार आहे.