पुणे: उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व भाजपा नेत्या उमा भारती यांच्याबद्दल सोशल मीडियामध्ये अपमानजनक पोस्ट केल्याप्रकरणी अज्ञातावर बारामती पोलिस स्टेशन मध्ये तक्रार
Baramati Police Station | Photo Credits: Twitter/ ANI

पुणे जिल्ह्यातील बारामती पोलिस स्टेशनमध्ये एका अज्ञात व्यक्तीच्या विरोधात देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Vice President Venkaiah Naidu) आणि भाजपा नेत्या उमा भारती (BJP leader Uma Bharti) यांच्याबद्दल सोशल मीडीयामध्ये अपमानकारक पोस्ट केल्याबद्दल FIR दाखल केली आहे. दरम्यान तक्रार करणारी व्यक्ती ही ABVP कार्यकर्ता असून आयपीसी सेक्शन 505(2) अंतर्गत ही एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती ANI ट्वीटच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोना संकटकाळात अयोद्धेमध्ये राम मंदिर भूमिपूजन आणि शिलान्यास या कार्यक्रमावरून भाजपाला लक्ष्य केले होते. त्यावर शरद पवारांचे वक्तव्य हे भगवान राम विरोधी असल्याची प्रतिक्रिया भाजपा नेत्या उमा भारती यांनी दिली होती. तर राज्यभेमध्ये नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधी दरम्यान भाजपा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी 'जय शिवाजी जय भवानी' घोषणा दिल्यानंतर सभापती आणि राष्ट्रपती व्यकंय्या नायडू यांनी शपथविधी दरम्यान घोषणा देऊ नका असा दम भरल्यानंतर महाराष्ट्रामध्ये शिवभक्तांना त्यांचं हे वागणं म्हणजे शिवरायांचा अपमान केल्यासारखं असल्याचं वाटत होतं. दरम्यान यावरून समाजात आणि सोशल मीडीयामध्येही उग्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. (हेही वाचा, शिवरायांच्या नावाने राजकारण नको; व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चूकीचं नाही- खासदार उदयनराजे भोसले यांचं 'जय भवानी जय शिवाजी' घोषणा प्रकरणावर स्पष्टीकरण).

ANI Tweet

दरम्यान जय भवानी जय शिवाजी घोषणेच्या वादानंतर उदयनराजे आणि व्यंकय्या नायडू या दोघांनीही आपली बाजू मीडीयासमोर स्पष्ट केली होती. यामध्ये व्यंकय्या नायडू यांनी ट्वीटर वरून आपली बाजू मांडताना त्यांच्याबद्दल अनादर नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.