शिवरायांच्या नावाने राजकारण नको; व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चूकीचं नाही- खासदार उदयनराजे भोसले यांचं 'जय भवानी जय शिवाजी' घोषणा प्रकरणावर स्पष्टीकरण
उदयनराजे भोसले (फोटो सौजन्य-फेसबुक)

दिल्लीमध्ये काल (22 जुलै) राज्यसभा सदस्यत्त्वाची शपथ घेतल्यानंतर भाजपा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी ' जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिल्यानंतर सभापती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांनी समज देत केवळ शपथ घ्या घोषणा देऊ नका असं म्हटल्यानंतर महाराष्ट्रात काही शिवभक्तांच्या भावना दुखावल्या. यानंतर व्यंकय्या नायडूंचा निषेध देखील महराष्ट्रात करण्यात आला. पण आज (23 जुलै) खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत शिवाजी महाराजांचा अपमान झालेला नाही. राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी केवळ राज्यघटनेला धरून असलेले नियम सांगितले. दरम्यान शिवाजी महाराज यांच्या नावाने राजकारण करू नका असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे. दरम्यान आक्षेप व्यंकय्या नायडूंचा नव्हे तर कॉंग्रेसच्या खासदाराचा अशी माहिती देखील त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.   उदयनराजे भोसले यांनी राज्यसभा खासदार पदी शपथ घेताना दिली जय भवानी जय शिवाजी घोषणा; सभापती व्यंकय्या नायडू यांनी सुनावले (Watch Video)

'माझा स्वभाव पाहता शिवरायांचा अपमान झाला असता तर मीच तिथल्या तिथे राजीनामा दिला असता' असं म्हणत उदयनराजे यांनी महाराष्ट्रात आंदोलन छेडण्याची भाषा करणार्‍यांना शिवरायांच्या नावाने राजकारण करू नका असं म्हटलं आहे. यावेळेस उदयनराजे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनादेखील टोला लगावला आहे. 'महान व्यक्ती आहेत.' अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान एकेकाळी आम्ही महाराजांच्या कुटुंबातील आहोत का? याचे पुरावे मागणारे आता आम्हांला या घटनेनंतर शिवरायांचा दिल्ली दरबारी अपमान का? हे कोण ठरवणार?याचा जबाब विचारत असल्याचं म्हटलं आहे. तर उदयनराजे यांनी व्यंकय्या नायडूंना पत्र पाठवणार्‍यांनी जरूर पत्र पाठवावीत अशी प्रतिक्रिया देखील दिली आहे. Rajyasabha MP Oath Ceremony:  शरद पवार, उदयनराजे भोसले, रामदास आठवले पुन्हा खासदार; राजीव सातव यांचा दिल्लीत मराठी बाणा.  

संजय राऊत यांनी दिल्लीत बोलताना 'जय भवानी जय शिवाजी' ही घोषणा घटनाबाह्य आहे असं वाटत नसल्याचं म्हटलं आहे. तर उदयनराजे भोसले यांचे बोलणे 'लॉजिकल' असल्याचं म्हणत हा विषय संपला असं वाटत असल्याचेही म्हटलं आहे. मात्र 'जय भवानी जय शिवाजी' हा मराठ्यांचा मंत्र आहे. अपमानाचा भाग पाहता हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे.

दरम्यान काल महाराष्ट्रासह राज्यसभेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला. यावेळेस शरद पवार, राजीव सातव, प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह महाराष्ट्रातील 6 खासदारांचा शपथविधी सोहळा झाला.