कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या (Rajyasabha) नवनियुक्त खासदारांचा शपथविधी सोहळा उशिराने आज पार पडला. उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांच्या दालनामध्ये हा सोहळा घेण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) ची साथ सोडून भाजप (BJP) मध्ये प्रवेश घेतलेल्या उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) यांनी सुद्धा खासदार पदाची शपथ घेतली. उदयन राजे यांनी शपथ घेऊन झाल्यावर जय हिंद, जय भारत, जय शिवाजी, जय भवानी अशा घोषणा सुद्धा दिल्या मात्र यावर सभापती व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त करत हे राज्यसभेचं सभागृह नाही माझं दालन आहे त्यामुळे कोणीही कोणत्याच घोषणा देऊ नयेत अशा शब्दात समज दिली. Rajyasabha MP Oath Ceremony: शरद पवार, उदयनराजे भोसले, रामदास आठवले पुन्हा खासदार; राजीव सातव यांचा दिल्लीत मराठी बाणा
यापूर्वी सुद्धा अनेकवेळा शपथविधी सोहळ्यात खासदारांनी अशा प्रकारे अन्य घोषणा दिल्याने वाद झाले आहेत. मागील वर्षी लोकसभा सदस्यपदाची शपथ घेताना सुद्धा काही खासदारांनी धार्मिक घोषणा दिल्या होत्या, इतकेच काय तर महाराष्ट्रात सुद्धा मुख्यमंत्री शपथविधी सोहळा होताना अन्य आमदारांनी घोषणा देत शपथ घेतल्याने वाद झाला होता. या एकूण पार्श्वभूमीवर व्यंकय्या नायडू यांची आजची प्रतिक्रिया आहे. हा सोहळा रेकॉर्ड होत आहे त्यामुळे सर्व सदस्यांनी केवळ शपथच घ्यावी, घोषणा देऊ नये अशा शब्दात नायडू यांनी उदयन राजे यांना समज दिली आहे.
उदयन राजे भोसले राज्यसभा खासदार शपथविधी व्हिडीओ
मत मागताना छत्रपती शिवाजी महाराज चालतात पण सभागृहात शपथ घेताना नाव घेतलं तर झोंबलं....
उपराष्ट्रपती वैंकया नायडू ने माफी मागितली पाहिजे #शेमऑनवैंकयानायडू pic.twitter.com/j70m0hcvUB
— Siddhesh Nikam Patil (@NikaSi_SiD) July 22, 2020
दरम्यान, आज महाराष्ट्रातुन 6 खासदारांनी शपथ घेतली. यामध्ये शरद पवार, उदयनराजे भोसले , प्रियंका चतुर्वेदी, डॉ. भागवत किशनराव कराड (, राजीव सातव आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांचा समावेश आहे. याशिवाय फौजिया खान या सुद्धा राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्त झाल्या आहेत मात्र त्यांना कोरोनची लागण झाली असल्याने त्या आज शपथविधी सोहळ्याला उपस्थित नव्हत्या.