पुणे: प्रेमात अडसर ठरत असल्याने मुलाने प्रेयसीच्या मदतीने केला आईचा खून
Image used for represenational purpose (File Photo)

पुण्यातून (Pune) एक धक्कादायक घटना समोर येत आहे. प्रेमात अडसर ठरत असल्याने मुलाने प्रेयसीच्या मदतीने आईचा खून केला आहे. या प्रकरणी आरोपी मुलगा आणि त्याच्या प्रेयसीला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. आईच्या हत्येचा बनाव रचून आरोपी मुलाने पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र मुलाच्या जबाबातील तफावत पोलिसांच्या लक्षात आली आणि काही तासांत त्यांनी सत्य समोर आणले. सुशीला राम वंजारी (38) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

विशाल राम वंजारी (19) असे त्या मुलाचे नाव असून त्याची 26 वर्षीय प्रेयसी नॅन्सी गॅब्रिअल डोंगरे यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास माने वस्तीमध्ये एका महिलेचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस घटनास्थळी पोहचले असता सुशीला वंजारी या मृत अवस्थेत आढळल्या. त्यावेळेस मुलगा विशाल वंजारी देखील तेथे उपस्थित होता. नांदेडच्या एका व्यक्तीकडून कर्ज घेतले होते त्यानेच आईचा खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार एफआयआर देखील दाखल करण्यात आली. मात्र त्याच्या जबाबात तफावत आढल्याने पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली. त्यात त्याने गुन्ह्याची कबुली दिली. (मेरठ: मोबाईल खरेदी करण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने केली सावत्र आईची हत्या)

विशालने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, नॅन्सी आणि त्याच्या प्रेमसंबंधांना आईचा विरोध होता. तसंच घरातून पैसे चोरण्याच्या त्याच्या सवयीमुळे आई आणि त्याच्यात वाद होत असतं. सोमवारी दुपारी त्याने घरातून 15 हजार 500 रुपये चोरले त्यावरुन दोघांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्याच रागातून विशालने प्रेयसीच्या मदतीने चाकूहल्ला करत आईचा खून केला.  त्यानंतर आईचा मृतदेह घराबाहेर टाकला आणि बनाव रचत पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र अल्पावधीतच सत्य समोर आले.