राज्यातील नाले किंवा खोदकामाच्या ठिकाणी नागरिकांना त्याबाबत सुचना देणारे बोर्ड लावणे अनिवार्य आहे. परंतु असे असूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना घडल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहे. त्यातच आता एक नवी भर पडली असून पुणे (Pune) मधील सिंहगड येथे 2 वर्षांचा लहान मुलगा खेळत असताना नाल्यात तोल जाऊन पडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुलाचे शोधकार्य अद्याप सुरु असून ही घटना दुपारच्या वेळेस घडली आहे. संस्कार साबळे असे मुलाचे नाव असून त्याचा अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरु करण्यात आले आहे. तर तोल जाऊन पडलेला नाला 10 फूट खोल असल्याचे सांगण्यात येत असून यामधून सतत पाण्याचा निचरा होत असतो. नाल्यात पडल्यानंतर संध्याकाळ पर्यंत त्याचा शोध घेण्यात येत होता. पण रात्री उशिरा त्याचे शोधकार्य थांबण्यात आल्यानंतर सकाळपासून पुन्हा शोध घेतला जात आहे.
मराठवाडा येथून साबळे कुटुंबिय पुण्यात राहण्यासाठी आले होते. तर संस्कार घराबाहेर खेळत असताना त्याचा तोल जाऊन तो नाल्यात पडला. नाल्यात पडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर तातडीने त्याचा शोध सुरु करण्यात आला. नाल्याच्या परिसरात झाडे झुडपे भरपूर असल्याने अग्निशमन दलाला संस्कार याचा शोध घेण्यास अडथळा निर्माण होत आहे.(ठाणे येथे नाल्यात पडून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू, स्थानिकांकडून संताप व्यक्त)