पुणे: TV बघण्यावरून ओरडल्याने 14 वर्षीय मुलाची गळफास लावून आत्महत्या
Image used for Representational Purpose only (Photo Credits: PTI)

पुणे (Pune) येथील बिबेवाडी (Bibbewadi) भागात एका 14 वर्षीय मुलाने आपल्या राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या (Suicide)  केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. या आत्महत्येचे कारण हे टीव्ही ठरला आहे. या प्रकरणात तपास करत असणाऱ्या पोलीस आयुक्तांच्या माहितीनुसार, या मुलाला टीव्हीवर कार्टून्स बघायचे होते तर त्याच्या आजीला बातम्या पाहायच्या होत्या. यावरून मुलगा आणि आई दोघांमध्ये वाद झाला यात आईने मुलाला ओरडून टीव्ही बंद करून टाकला. वास्तविक कोणत्याही सर्व साधारण घरात पाहायला ऐकायला मिळेल अशीच ही परिस्थिती आहे मात्र या ओरडण्याचा राग मनात धरून मुलाने आत्महत्या करण्याएवढे मोठे पाऊल उचलले. Aurangabad Murder Case: औरंगाबाद मध्ये बहीण-भावाच्या हत्येने खळबळ; घरातील सोनं, रोख रक्कम लंपास

प्राप्त माहितीनुसार, हा एकूण प्रकार मंगळवार 9 जून रोजी घडला आहे. पुण्याच्या बिब्बेवाडी बागायत आदर्श चाळ येथे आई, आजी आणि बहिणीसोबत हा मुलगा राहात होता. जेव्हा आईने मुलाला ओरडून टीव्ही बंद केला तेव्हा मुलगा आपल्या घरात वरच्या माळ्यावर गेला. सुरुवातीला त्याच्या डोक्यात असे काही येईल असा विचारही केला नव्हता असे त्याच्या आईने पोलिसांना सांगितले. बराच वेळ झाला तेव्हाही हा मुलगा खाली आला नाही तेव्हा या मुलाची बहीण त्याला पाहण्यासाठी वर गेली आणि तेव्हा हा सर्व प्रकार उघड झाला.

ANI ट्विट

यानंतर घाबरून गेलेल्या आई आणि बहिणी शेजाऱ्यांच्या मदतीने मुलाला जवळच्या हॉस्पिटल मध्ये नेले मात्र तिथे जाण्याआधीच त्याने प्राण सोडला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आणि त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.