Pro Govinda League 2024 | (Photo Credits: instagram)

प्रो गोविंदा लीग सीझन 2 (Pro Govinda League Season 2 Finale) चषकावर जय जवान गोविंदा (Jai Jawan Govinda) पथक अर्थातच सातारा सिंघम (Satara Singhams) आपले नाव कोरण्यात यशस्वी झाला आहे. विशेष म्हणजे सातारा सिंगमने सलग दुसऱ्या वर्षी हा चषक जिंकला. त्यामुळे यंदाही या पथकाला तब्बल 25 लाक रुपयांचा धनादेष बक्षीस रुपात प्राप्त झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा धनादेश आणि ट्रॉफी संघाला प्रदान करण्यात आली. रचत सातारा सिंघमने अवघ्या 33.39 मिनिटात थर रचत मनोरा लावला आणि विजयावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, कोल्हापूर किंग्स (Kollhapur Kings) म्हणजेच बलवीर गोविंदा (Balveer Govinda) उपविजेता ठरला. याच वेळी इतरही संघ दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाने विजयी झाले. काही संघ उत्तेजनार्थ ठरले.

एकूण 16 गोविंदा पथकांमध्ये रंगला थरार

दहीहंडी स्पर्धेत एकूण 16 गोविंदा पथके सहभागी झाली. या 16 संघांना चार गटांमध्ये विभागण्यात आले होते. उपांत्यपूर्व फेरीत ठाणे टायगर्स, लातूर लिजेंड्स, सातारा सिंघम्स आणि वेस्टर्न मुंबईने विजय मिळवून प्रभावी कौशल्य आणि रणनीती दाखवली. कोल्हापूर किंग्ज आणि सातारा सिंघम्सने महाअंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केल्याने उपांत्य फेरीने उत्साह वाढवला. फायनलमध्ये सातारा सिंघम्सने कोल्हापूर किंग्सवर विजय मिळवून विजेतेपदावर सांगितलेला दावा खरा करुन दाखवला. (हेही वाचा, Pro Govinda League 2024 Live Streaming: दहीहंडी शौकिनांनो, प्रो गोविंदा लीग लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे पाहाल? घ्या जाणून)

विजेते आणि बक्षीस रक्कम

सातारा सिंघम्स (जय जवान गोविंदा): प्रथम क्रमांक, 25 लाख रुपयांचेबक्षीस

कोल्हापूर किंग्स (बलवीर गोविंदा): उपविजेता, 15 लाख रुपयांचे बक्षीस

लातूर लिजेंड्स (यश गोविंदा): द्वितीय क्रमांक, 10 लाख रुपयांचे बक्षीस

तृतिय क्रमाक, 5 लाख रुपयांचे बक्षीस

सेलिब्रेटींची हजेरी

प्रो गोविंदा लीग फिनाले अनेक सेलिब्रेटींच्या उपस्थितीमुळे विशेष आकर्षीत ठरला. ज्यामध्ये मिका सिंग, जॅकी भगनानी आणि अर्जुन बिजलानी यांसारख्या सेलिब्रिटींनी भाग घेतला होता. करणवीर बोहरा, मीट ब्रॉस जोडीचे संगीतकार हरमीत सिंग, अभिनेत्री महिमा चौधरी आणि गायक अरविंदर सिंग यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींनी कार्यक्रमाच्या ग्लॅमरमध्ये भर घातली.

इन्स्टाग्राम पोस्ट

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Satara Singhams (@prssatarasinghams)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बक्षीस वितरण करताना सांगितले की, दहीहंडी हा साहसी खेळ आहे. ज्यामध्ये गोविंदा सहभागी होतात. हा एक पारंपरीक खेळ आहे. या खेळाची व्यापकता वाढविण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. या सणाचा प्रमुख क्षण म्हणजे गोपाळकाला. त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत 75 हजार गोविंदांचे विमा काढण्यात आले आहेत. असे असले तरी, यंदाचा उत्सव उपघातमुक्त साजरा करा, असेही अवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.