'पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त चार तास झोप घेतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेवढा वेळ तरी काम करावे' भाजप आमदार अतुल भातखळकर यांची टीका

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर पडले पाहिजे, अशी टीका विरोधकांकडून वारंवार केली जात आहे. त्यानतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कामाची पद्धत आहे, असे म्हणत विरोधकांना टोला लगावला आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त चार तास झोप घेतात, उद्धव ठाकरे तेवढा वेळ तरी काम करावे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

“कार्यकारी उद्धवजींची तुलना ब्रह्मदेवाशीही करू शकतात. बाकी सत्य काय ते महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊकच आहे. उद्धवजीना एकच विनंती मोदीजी फक्त चार तास झोप घेतात, तेवढा वेळ तरी काम करा", अशा आशयाचे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे. अतुल भातखळकर यांनी केलेल्या विधानावर अद्याप शिवसेना पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. हे देखील वाचा- Supriya Sule Demand To Reopen Restaurants: महाराष्ट्रातील उपाहारगृह पुन्हा सुरु करावीत; राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

अतुल भातखळकर यांचे ट्विट-

सरकारकडे मागण्या मांडण्याचा विरोधकांना अधिकार आहे. ते सुद्धा लोकशाहीचे, महाराष्ट्राचे घटक आहेत. भूमिका मांडण्याचा त्यांनाही अधिकार आहे. पण हे करताना भान ठेवले पाहिजे. ही वेळ मंदिर उघडण्याची नाही हे सरकारला वाटत असेल तर समजून घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकार कोरोनाला देवाची करणी मानत नाही. या संकटाशी आपल्याला लढायचे आहे हे माहिती असतानाही विरोध असे वागत असतील तर हे जनतेच्या हिताचे नाही. उद्धव ठाकरे यांच्या कामाच्या पद्धतीवर टीका करणाऱ्यांनी सगळ्यात आधी नरेंद्र मोदींनाही अशा पद्धतीने काम न करता संपूर्ण देश पालथा घालावा असे सागण्याचे धाडस करावे”, असे संजय राऊत यांनी म्हणाले आहेत.