Supriya Sule, Uddhav Thackeray (Photo Credit: PTI)

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गेल्या चार महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) लॉकडाऊन आहे. परिणामी, उद्योगधंदे, व्यवसाय, वाहतूकीसह बऱ्याच गोष्टी बंद आहेत. मात्र, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनच्या अनेक निर्बंधांना शिथिलता देण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात टप्प्याटप्प्याने सर्व गोष्टी सुरु होत आहेत. दरम्यान, राज्य सरकारने सोमवारपासून हॉटेल आणि लॉज सुरु केले आहेत. मात्र, उपाहारगृहतून (Restaurants) केवळ पार्सलसेवा सुरु आहेत. महत्वाचे म्हणजे, या व्यवसायातत असणारे इतर लोकांना आर्थिक अडचणींना समोरे जावा लागत आहे. यामुळे राज्यातील उपाहारगृह पुन्हा सुरु करण्यात यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

कोरोनाच्या संकाटामुळे राज्यातील उपाहारगृहचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. सध्या पार्सल्सची मुभा देण्यात आली असली तरी यातून या उद्योगाला सावरण्यासाठी पुरेशी नाही. याशिवाय अनेक उपाहारगृहचालकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुख्यमंत्र्यांनी या व्यावसायिकांना होणारा त्रास लक्षात घेता, सुरु होणे आवश्यक आहे.यासाठी आवश्यक असणारे सोशल डिस्टन्सिंग आदीचे आवश्यक दिशानिर्देश देखील जारी करावेत. आपणास विनंती आहे, की कृपया या व्यावसायिकांच्या बाबतीत सहानुभूतीपुर्वक विचार करुन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशा आशयाचे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे. हे देखील वाचा-'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही देश पालथा घालण्यास सांगावे' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करणाऱ्यांना संजय राऊत यांचे प्रत्युत्तर

सुप्रिया सुळे यांचे ट्वीट-

याआधीही सुप्रिया सुळे यांनी राज्यातील जिम सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले होते. राज्यात जीम पुन्हा सुरु करणे आवश्यक असून अनेक जिम चालकांनी यामध्ये मोठी गूतवणूक केल्याचे त्या म्हणाल्या होत्या. मात्र, आता अनलॉक 4 ला सुरुवात झाली असून जिमबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.