देशासह महाराष्ट्रामध्ये आज (1 मे) पासून गॅस दरवाढीचा भडका उडाला आहे. मुंबईमध्ये आजपासून अनुदानित एलपीजी गॅस (LPG cylinder with subsidy) 0.29 रूपयांनी तर विना अनुदानित एलपीजी गॅस (LPG cylinder without subsidy) 6 रूपयांनी महागला आहे. आजपासूनच ही नवी दरवाढ लागू होणार असल्याने सामान्यांचं आर्थिक गणित कोलमडणार आहे. प्रत्येक गरीब कुटुंबाला मोफत LPG गॅस कनेक्शन; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
ANI Tweet
Price of LPG cylinder with subsidy increased by Rs 0.28 in Delhi & Rs 0.29 in Mumbai, price of LPG cylinder without subsidy increased by Rs 6 in both Delhi and Mumbai. pic.twitter.com/elf87BM5OW
— ANI (@ANI) May 1, 2019
1 मे पासून लागू करण्यात आलेल्या दरवाढीमुळे मुंबईमध्ये आता अनुदानित गॅस सिलेंडरसाठी सुमारे 493.86 तर विना अनुदानित गॅस सिलेंडरसाठी 684.50 रूपये मोजावे लागणार आहेत. मुंबईप्रमाणे दिल्लीमध्येही गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिमाह आर्थिक नियोजनात सिलेंडर किंमत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळे गॅस सिलेंडरचे दर हा सर्वसामान्यांसाठी मोठा कळीचा विषय असतो. तर, या किमती नियंत्रणात ठेवणे अथवा त्या नियंत्रणात ठेवण्यासाठी ग्राहकांना अनुदान देणे यासाठी केंद्र सरकारवर मोठा दबाव असतो. गॅस, पेट्रोल, रोजगार आदी मुद्द्यांबाबत सरकारला नेहमीच जागृत राहावे लागते. गॅस, पेट्रोल अशा इंधनांच्या दरात थोडीफार जरी वाढ झाली तर, केंद्र सरकारविरोधात सर्वसामान्य जनतेत नाराजी निर्माण व्हायला सुरुवात होते.