Neral Shocker: नवी मुंबईत मालमत्तेच्या वादातून एका गर्भवती महिलेची आणि तिच्या पतीसह 11 वर्षीय मुलाची हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. या तिहेरी हत्याकांडातील महिला सात महिन्याची गरोदर असल्याची माहिती देखील समोर आली. ऐन गणेशोत्सवाच्या सणात घडलेल्या या हत्याकांडामुळे रायगड जिल्हा हादरला आहे. रविवारी, 9 सप्टेंबर रोजी नेरळ येथे त्यांच्या घराच्या मागे डोक्याला मार लागल्याने मृतावस्थेत तिघे आढळले.
मदन पाटील (४०), अनिशा पाटील (३५) आणि त्यांचा मुलगा विवेक अशी तीन मृतांची नावे आहेत, असे टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. पाटील कुटुंब हे रायगडमधील कर्जत येथील कळंब गावचे रहिवासी होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, मालमत्तेच्या वादातून गर्भवती महिला आणि तिच्या कुटुंबाची हत्या झाली असावी.
मालमत्तेचा वाद असल्याचा पोलिसांना संशय
बेपत्ता असलेला मदन पाटील याचा भाऊ नेरळ येथील तिहेरी हत्याकांडातील प्रमुख संशयित म्हणून पुढे आला आहे. कथित हत्येबद्दल बोलताना रायगड जिल्ह्याचे पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे म्हणाले की, रुग्णालयाच्या प्राथमिक अहवालावरून असे दिसून आले आहे की, मृतांच्या डोक्याला दुखापत झाली होची. हा दुखापत एखाद्या जड वस्तूने डौक्याला मार लागल्या मुळे झाली असावी ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा संशय आहे.
अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर खून उघडकीस आला
तपासादरम्यान, पोलिसांना हे देखील कळले की मृत व्यक्ती हा शेतकरी होता. जो त्याच्या मोठ्या भावासोबत मालमत्तेच्या वादात अडकला होता. पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे की भावाला त्यांच्या वडिलोपार्जित घर किंवा शेतजमिनीचा वाटा हवा होता आणि यावरून दोन भावांमध्ये भांडण झाले. रविवारी, 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास स्थानिकांनी अल्पवयीन मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
यानंतर शोध घेतल्यानंतर पालकांचे मृतदेह सापडले. दरम्यान, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध तिहेरी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.