Mumbai Local (Photo Credit - PTI)

Mumbai Power Cut Update: आज सकाळी नवी मुंबई परिसरातील सुमारे 10 वाजल्यापासून खंडित झालेला वीज पुरवठा पुन्हा सुरळीत झाला (Power Supply Resumes In Navi Mumbai) आहे. तसेच वीज पुरवठा सुरू झाल्याने हार्बर मार्गावरील सीएसएमटी-पनवेल दरम्यान धावणाऱ्या लोकल रेल्वे गाड्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. (Harbour Line Resumed) आम्ही सीएसएमटी-कल्याण, सीएसएमटी-कर्जत / कसारा दरम्यान सेवा पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मुंबईहून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक बदलले असून येणाऱ्या गाड्यांच्या वेळातदेखील बदल झाले आहेत, असं मध्ये रेल्वेच्या सीपीआरओ (CPRO) ने सांगितलं आहे.

आज सकाळी लालबाग, परळ, अंधेरी, दादर, ठाणे, वडाळा आणि नवी मुंबई या भागातील वीज पुरवठा खंडीत झाला. दरम्यान, सध्या नवी मुंबई आणि दादर परिसरात वीज पुरवठा सुरळीत झाला आहे. तसेच मुंबई सेंट्रल रेल्वेची मेन रेल्वे सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. (हेही वाचा - Mumbai Power Cut: मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघरमधील वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे ऑनलाईन परीक्षेमध्ये अडथळा; विद्यार्थ्यांनी केली ट्विटरवर तक्रार)

दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबईतील वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यानंतर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि महानगरपालिका आयुक्त यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. तसेच वीज पुरवठा लवकरात- लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या.