Mumbai Local trains. Image Used For Representational Purpose Only.(Photo Credits: ANI)

Mumbai Power Cut:  टाटाच्या वीजपुरवठ्यात बिघाड झाल्याने (TATA's Incoming Electric Supply Failure) मुंबईतील वीजपुरवठा खंडित (Electric Supply In Mumbai) झाला आहे. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहनने यासंदर्भात माहिती दिली आहे. याशिवाय वीजपुरवठ्यात बिघाड झाल्याने मध्ये रेल्वे मार्गावरील मुंबई उपनगरी गाड्यांची वाहतूक बंद झाल्याचं मध्य रेल्वेने स्पष्ट केलं आहे. लवकरचं रेल्वे सेवा सुरळीत केली जाईल, असं आश्वासन मध्ये रेल्वे विभागाने दिलं आहे.

ग्रीडमध्ये बिघाड झाल्यामुळे मुंबई उपनगरी रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून सकाळी 10 वाजल्यापासून प्रवासी अडकले आहेत. अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्याने कार्यालये तसेच लोकल रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, लालबाग, परळ, अंधेरी, दादर, ठाणे, वडाळा आणि नवी मुंबई या भागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. ग्रिड फेल्युअरमुळे हा बिघाड झाल्याचं सांगण्यात येत आहे. (हेही वाचा - Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता, ऑरेंज अलर्ट जारी)

दरम्यान, अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्याने मुंबईतील पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी प्रवासी सकाळी 10 वाजल्यापासून लोकलमध्ये अडकून पडले आहेत. महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित आहे, असं महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले यांनी सांगितलं आहे.