Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता, ऑरेंज अलर्ट जारी
Rain | mage Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात पावासाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. हवामान विभागाने ( Indian Meteorological Department) वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत मंगळवार (13 ऑक्टोबर) आणि बुधवारी (14 ऑक्टोबर) राज्यातील काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह पाऊस (Rain with Thunderstorms And Lightning) कोसळेल. मध्य महाराष्ट्रात पावसाची अधिक शक्यता असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.

हवामान विभागाने माहिती देताना म्हटले आहे की, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत तयार झाले आहे. हे क्षेत्र पुढच्या 24 तासांमध्ये तामिळनाडू किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे. यासोबतच बंगालच्या उपसागरामध्ये आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रावरील अवकाशात मोठ्या प्रमाणावर बाष्प तयार झाले आहे. परिणामी राज्यातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी पावसाच्या दमदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाचे डॉ. अनुपम काश्यपी यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली आहे. (हेही वाचा, Maharashtra: नागपूर येथे वीज पडून 3 मजूरांचा बळी तर 2 जण जखमी)

भारतीय हवामान विभागाने रविवारी इशारा दिला आहे की, राज्यातील काही ठिकाणी पाऊस पुन्हा एकदा आठवडाभर सक्रीय राहणार आहे. घाटमाथा आणि पुणे येथे काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकेल. यासोबतच राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भ आदी ठिकाणीही हलका ते मध्यमस स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या काही भागांमधून मोसमी पाऊस परतत आहे. असे असले तरी महाराष्ट्रात मोसमी पाऊस परतण्यात आणखी काही काळ लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान, मध्य महाराष्ट्रात प्रचंड मेघगर्जनेसह पर्जन्यवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार राज्यातील काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच, पावसामुळे काही ठिकाणी अपघातही घडल्याचे वृत्त पुढे येत आहे. नागपूरमध्ये विज कोसळून 2 मजूर ठार झाले आहेत. तर 2 जघमी झाले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात पुढचे दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. वेगवान वारे, मेघगजनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट दिला देण्यात आला आहे.