महाराष्ट्रात 28 सप्टेंबर पासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अधूनमधून ढगाळ वातावरण, पाऊस, ढगांचा गडगडाट अधूनमधून होताना दिसून येतो. याच पार्श्वभुमीवर नागपूर जिल्ह्यात वीज पडून तीन महिला मजूरांचा बळी गेला असून अन्य दोन जण अत्यंत गंभीर जखमी झाले आहेत. याबद्दलची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. हे सर्व मजूर आपल्या घरी जात असताना जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसापासून बचाव व्हावा म्हणून शिवा गावातील एका झाडाखील थांबले होते.(Maharashtra Weather Forecast: औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली सह 'या' भागात पुढील 3-4 तासांत पर्जन्यवृष्टीची शक्यता- IMD)
मुसळधार पावसातून घरी जाणार कसे हा प्रश्न मजूरांच्या समोर उभा राहिला होता. याच कारणास्तव यांनी झाडाखाली आश्रय घेत तेथे थांबण्याचा निर्णय घेतला. मात्र आकाशातून वीज झाडावर कोसळून त्यात महिला जखमी झाल्या. ही घटना घडल्यानंतर जखमींना ग्रामस्थांकडून तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . पण त्यामधील तीन जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांची ओळख पटली असून अर्चना तातोडे, श्रद्धा उईके आणि संगीता मुंगभाते अशी त्यांची नावे आहे. या प्रकरणी अपघाती मृत्यूची पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.
3 dead, 2 injured in lightning strike in Maharashtra's Nagpur district: police
— Press Trust of India (@PTI_News) October 11, 2020
दरम्यान, राज्यात परतीच्या मान्सूने हजेरी लावत विजांच्या कडकटासह पावसाच्या सरी कोसळत असल्याचे दिसून आले आहे. तर कोल्हापूर, सांगली. सातारा, सोलापूरसह अन्य ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. याच पार्श्वभुमीवर सांगलीतील खानापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्याचसोबत अग्रणी नदीला पूर आला आहे. या मुळे पुराची परिस्थिती निर्माण झाल्याने त्यात दोन जण वाहून गेल्याची घटना रविवारी घडली आहे.