Power cut in Mumbai, Thane And Other Areas | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Mumbai Power Cut: महापारेषणच्या कळवा- पडघा GIS केंद्रात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे, कल्याण, पालघर व नवी मुंबई मधील वीज खंडीत (Electricity Failure In Mumbai) झाली. याचा परिणाम ऑनलाईन क्लास आणि परीक्षांवर (Online Exams Affected)  झाला. वीज पुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांनी ट्विटरवर ऑनलाईन परीक्षा देण्यात अडथळा येत असल्याचं सांगत यासंदर्भात तक्रार केली आहे. ऑनलाईन परिक्षा नियोजित असल्याने वीज पुरवठा लवकरात-लवकर सुरू करावा, यासाठी अनेकांनी अदानी आणि टाटा सारख्या वीज पुरवठादारांना ट्विट केले आहे.

सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई व इतर भागांत वीज खंडित झाल्याने अनेक भागातील नागरिकांनी वीज पुरवठा खंडित झाल्याची तक्रार केली. ही लोड-शिडिंग असू शकते, असा अंदाजही काहीजणांना बांधला. मात्र, टाटाच्या वीजपुरवठ्यात बिघाड झाल्याने मुंबईतील वीजपुरवठा खंडित झाला असल्यास बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहनने सांगितलं. (हेही वाचा - Mumbai Power Cut: टाटाच्या वीजपुरवठ्यात बिघाड झाल्याने मुंबईतील वीजपुरवठा खंडित; मुंबई उपनगरी लोकल रेल्वे गाड्यांची वाहतूकही ठप्प)

वीज पुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांनी ट्विटद्वारे केलेल्या तक्रार -  

अचानक विजपुरवठा खंडीत झाल्याने मध्य रेल्वेवरील लोकल वाहतूक ठप्प झाली. सकाळी दहा वाजल्यापासून रेल्वे गाड्या थांबल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, कळवा-पडघा पॉवरहाऊसच्या सर्किट 2 मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे ते मुंबई दरम्यानच्या भागांत वीज पुरवठा खंडित झाला असून पुढील एका तासात वीज पुरवठा सुरळीत होईल, अस आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.