Mumbai International Airport ceiling slab (Photo Credits: ANI)

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Mumbai International Airport) हे जगातील व्यस्त विमानतळांच्या यादीमध्ये अव्वलस्थानी आहे. सांताक्रुझ येथील या विमानतळावर काल (30 जुलै) च्या रात्री या विमानतळाच्या स्लॅबचा काही भाग कोसळल्याचं वृत्त समोर आलं आहे.2006 साली मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मर्यादित कंपनीने जी.व्ही.के. इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एअरपोर्ट्‌स कंपनी साउथ आफ्रिका या कंपन्यांना विमानतळाचे आधुनिकीकरण करण्याचे कंत्राट दिले होते आणि नवीन विमानतळ साकारले. प्राथमिक अंदाजानुसार, पाण्याच्या गळतीमुळे हा स्लॅब कोसळला असावा असे सांगण्यात आले आहे. सध्या मुंबईमध्ये जोरदार पावसाच्या सरी अधून मधून हजेरी लावत असल्याने मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडत आहे. ही घटना रात्री 10.30 च्या सुमारास घडली आहे.

ANI Tweet

मुंबईमध्ये जोरदार पाऊस

मुंबईमध्ये सतत कोसळणारा पाऊस सध्या मंदावला असला तरीही अधून मधून काही वेळ दमदार हजेरी लावत असल्याने सखल भागात पाणी साचल्याने वाहतूकीला फटका बसत आहे. तसेच जोरदार पावसामुळे मागील काही दिवसांपासून विमानसेवेलाही फटका बसला आहे. मुंबईमध्ये यंदा पावसाळ्यात अपघातांचे सत्रही वाढले आहे. मालाड, डोंगरी परिसरात इमारती कोसळल्याच्या घटना ताज्या आहेत. यामधील जखमींना सरकारने मदत जाहीर केली आहे.