Raj Kundra Pornography Case:  पोर्नोग्राफी प्रकरणात उद्योगपती राज कुंद्रा यांना 10 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी
Raj Kundra | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात प्रमुख आरोपी असलेले उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra Pornography Case) यांना 10 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्रा ( (Raj Kundra) यांचे वकील अबाद पोंडा यांनी ही माहिती मंगळवारी (27 जुलै) दिली. बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती असलेले राज कुंद्रा यांना मुंबईतील एका न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिसांनी राज कुंद्रा यांची कोठडी आणखी सात दिवस वाढवून मागितली होती. परंतू, न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळून लावत कुंद्रा यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. राज कुंद्रा यांना अश्लिल सामग्री ( Pornography Case) निर्मीती प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

या वेळी कुंद्रा यांच्या विरोधात फिर्यादींनी न्यायालयात सांगितले की, कुंद्रा यांच्या एका खासगी बँक खात्यात कुंद्रा यांच्या कंपनीशी संबंधित 1.13 कोटी रुपयांची रक्कम आढळून आली आहे. त्याची चौकशी करण्यसाठी पोलीस कोठडी वाढवून हवी आहे. दरम्यान, कुंद्रा यांच्यावरील रिमांड याचिकेचा विरोध करत पोंडा यांनी युक्तावाद केला की, कुंद्रा यांना ज्या आरोपाखाली अटक केली आहे ती

अटक जामीनपात्र आहे. फोंडा यांनी पुढे सांगितले की, यात काहीही नवे नाही तरीही फिर्यादींनी त्यांची कोठडी वाढवून मागितली आहे. जर पोलिसांनी कुंद्रा यांची सूटका केली असती तर त्यांनी तपासात अधिक सहकार्य केले असते.

कुंद्रा यांचे वकील पोंडा यांनी म्हटले की, कुंद्रा यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या अर्जावर बुधवारी (28 जुलै) मुख्य मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट समोर सुनावणी होईल. कुंद्रा यांनी आपल्या याचिकेसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे की, ते या प्रकरणाच्या तपासात पूर्ण सहकार्य करतील. ते प्रदीर्घ काळापासून अटकेत आहेत. (हेही वाचा, Raj Kundra Pornography Case: राज कुंद्राच्या कोठडीचा आज शेवटचा दिवस, अजून वाढणार का कोठडी ? याकडे लागलयं सर्वांचं लक्ष)

मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा यांना 19 जुलै रोजी अटक केली होती. त्यांच्यावर मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून अश्लील सामग्री बनवल्याचा आरोप आहे. या प्रकरणातच त्यांना अटक झाली आहे. त्यांच्या अटकेने बॉलवूड आणि उच्चभ्रू वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. अटकेनंतर त्यांना 23 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर ती कोठडी 27 जुलै पर्यंत वाढविण्यात आली. आता त्यांना 10 ऑगस्टपर्यंत न्यायालीन कोठडी सुनावण्यात आली आहे.