PMJKYPPA: ओबीसी नेते अनिल महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; पंतप्रधान जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियान, ओबीसी विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी झाली नियुक्ती
अनिल भाऊ महाजन (Photo Credit : Facebook)

प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियान (Pradhan Mantri Jan Kalyankari Yojana Prachar Prasar Abhiyan) मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली, एक नवीन ‘ओबीसी आघाडीची’ स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीय मंत्री डॉ.मुकेश शर्मा, प्रदेश अध्यक्ष श्री. भगवान बागुल यांच्या संमतीने शिफारस करून, महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष म्हणून श्री.अनिल महाजन (Anil Mahajan) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आता राज्यभरात ओबीसी विभागात सुद्धा चांगल्या पद्धतीने योजनांचा प्रचार प्रसार करण्यासाठी संधी उपलब्ध झाली आहे.

या आघाडीसाठी राज्यात, विभागात व जिल्हा स्तरावर ओबीसी विभागाची कार्यकारणी नियुक्ती करण्यात येणार आहे. सदर कमिटीचे पद व रचना या इतर समिती प्रमाणेच असणार आहेत. यामध्ये महिला, युवक देखील कार्य करू शकणार आहेत. यामध्ये प्रदेश अध्यक्ष म्हणून श्री.अनिल महाजन यांची नियुक्ती झाल्याने ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांना आनंद झाला असून, त्यांनी महाजन यांचे  अभिनंदन केले आहे. (हेही वाचा: Ramdas Athawale यांंचा शिवसेनेला सल्ला,म्हणे 'बाळासाहेबांंचं स्वप्न पुर्ण करायचं असेल तर भाजप, रिपाई कडे परत या')

दरम्यान याआधी ऑल इंडीया वेब मीडिया असोसिएशनचे (All India Web Media Association) अध्यक्ष अनिल महाजन यांनी, ‘सुशांत सिंह राजपूत’सारखे अनेक नविन बॉलिवूड स्टार अजूनही मानसिक तणावाखाली असल्याचे, मत व्यक्त केले होते. महाजन यांनी आपल्या सोशल मिडियावर एक पोस्ट लिहिली होती. यामध्ये त्यांनी बॉलिवूड मध्ये दादागिरी खपवून घेणार नाही व अन्याय होणाऱ्या कलाकारांच्या पाठीशी आम्ही उभे असल्याचे म्हटले होते. तसेच कलाकार, छोटे प्रोडक्शन हाऊस चालक, करियर घडवण्यासाठी आलेले अनेक तरुण-तरुणी यांच्यावर कोणी दबाव टाकत असेल, कोणी धमकी देत असेल किंवा आर्थिक नुकसान करत असेल. यामुळे आपण जर मानसिक दबावाखाली आले असाल तर मदतीसाठी आम्हाला संपर्क करा असे आवाहनही केले होते.