Ramdas Athawale यांंचा शिवसेनेला सल्ला,म्हणे 'बाळासाहेबांंचं स्वप्न पुर्ण करायचं असेल तर भाजप, रिपाई कडे परत या'
Ramdas Athawale (Photo Credit: Facebook)

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांंच्यात अलिकडेच एक बैठक पार पडली ज्याबद्दल राऊत आणि फडणवीस यांंनी आपआपल्या पद्धतीने स्पष्टीकरण दिले, पण असं असलं तरी या बैठकी नंंतर शिवसेना (Shivsena) येत्या काळात NCP व कॉंंग्रेसची साथ सोडुन आपला पुर्व मित्रपक्ष भाजपकडे परतेल अशा चर्चा सुरु आहेत. याच चर्चांच्या पार्श्वभुमीवर रिपाईचे प्रमुख रामदास आठवले (Ramdas Athawale) यांंनी तर मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)  यांंना थेट आपल्या मित्रांंकडे परत या अशा आशयाचा सल्ला सुद्धा दिला आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि कॉंंग्रेसने निर्माण केलेल्या चक्रव्युहात अडकु नये जर का तुम्हाला बाळासाहेबांंचे स्वप्न पुर्ण करायचे असेल तर उद्धव ठाकरे यांंनी भाजप व रिपाई कडे परत यावे असे रामदास आठवले यांंनी म्हंंटले आहे. SAD Quits NDA: कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या निर्णयाचे शरद पवार, संजय राऊत यांनी केले कौतूक

अर्थात रामदास आठवले यांंच्या या कमेंट वर शिवसेना किंंवा महाविकासआघादीच्या कोणत्याही घटक पक्षाने प्रतिक्रिया दिलेली नाही. राहिला प्रश्न देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांंच्या भेटीचा तर ही भेट सामना वृत्तपत्राच्या काही कामासंदर्भात होती आणि यात काही राजकीय मुद्दा नव्हता असे राऊत आणि फडणवीस दोघांंनीही सांंगितले आहे. संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही; देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

ANI ट्विट

दरम्यान, महाविकास आघाडी मध्ये सध्या तरी कोणताही वाद ठळक दिसुन येत नाहीये, खरंतर कृषी विधेयकाच्याबाबत ही महाविकासआघाडी एकत्र आहे, शिवसेना सुद्धा या विधेयकांंच्या विरुद्ध आहे असा विश्वास तीन्ही पक्षांंच्या वतीने महाराष्ट्र कॉंंग्रेस तर्फे वर्तवण्यात आला होता. अशावेळी खरंच शिवसेना महाविकास आघाडी सोडण्याच्या विचारात आहे असे म्हणण्यासाठी काहीही ठोस कारण नाहीये.

दुसरीकडे, उलट केंद्र सरकार मध्ये आता भाजपचीच ताकद थोडी कमी होताना दिसतेय NDA सरकार मधील आणखीन एक महत्वाचा पक्ष म्हणजेच शिरोमणी अकाली दल अलिकडेच NDA मधुन बाहेर पडला आहे तर यापुर्वी महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेने सुद्धा एनडीएला रामराम केला होता.