पंजाब अॅन्ड महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँक (PMC) घोटाळा प्रकरणी आता बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस (Joy Thomas) यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी जॉय थॉमस यांनी 6500 कोट्यावधींचा घपला केल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी ईडी (ED) कडून मुंबईतील सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली. तर पीएमसी संचालक सारंग आणि राकेश वाधवान यांना गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून अटक करण्यात आली आहे. तसेच 3500 कोट्यावधींची संपत्ती सुद्धा जप्त केली आहे. राकेश आणि सारंग यांच्या विरोधात लुकआउट सर्कुलर जाहीर केले होते. तसेच सरकारने इमिग्रेशन ऑथॉरिटी यांना या दोघांवर लक्ष ठेवण्याचे निर्देशन दिले होते.
पीएमसीकडून एचडीआयएलला कर्ज देण्यात आले होते, मात्र एचडीआयएलने कर्जाची रक्कम वेळेत न भरल्याने पीएमसी बँक आणि बँकेतील खातेदार आता अडचणीत आले आहेत.बँकेला 4355.43 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याबद्दल हा एफआयआर नोंदविण्यात आला आहे. तसेच बँकेमधील कर्जाची माहिती लपवण्यासाठी तब्बल 21 हजार खोटी खाती उघडण्यात आली असल्याची धक्कादायक बाब सुद्धा समोर आली होती. अहवालानुसार पीएमसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (आता निलंबित) जॉय थॉमस, अध्यक्ष वरम सिंग आणि अन्य अधिकाऱ्यांची नावे एफआयआरमध्ये होती. (PMC Bank Crisis: मुंबई पोलिसांकडून HDIL आणि PMC बँकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल; निलंबित संचालकाचेही नाव सामील)
ANI Tweet:
PMC bank matter: Suspended Managing Director of the bank, Joy Thomas has been detained by Economic Offence Wing.More details awaited pic.twitter.com/CKMZ1I0jLt
— ANI (@ANI) October 4, 2019
तसेच पीएमसीच्या घोटाळ्यानंतर आरबीआयने या बँकेवर पुढील 6 महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यानुसार, बॅंकांना आता कर्ज देणे ठेवी स्वीकारणे यासह मोठ्या आर्थिक व्यवाहारांवर निर्बंध आले आहेत. तसेच आरबीआयने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, आता खातेदार 25 हजार एकाच दिवशी किंवा सहा महिन्यांसाठी रूपयांची रक्कम काढू शकणार आहेत.