सध्या टिकटॉकने (Tik Tok) भारतात धुमाकूळ घातला असून अनेकांनी या अॅपला मोठी पसंती दाखवली आहे. परंतु, टिकटॉकमुळे मुलांवर वाईट संस्कार होत आहेत, यामुळे या अॅपवर बंदी घाला, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. न्यायालयात याचिका दाखल करणारी व्यक्ती ही गृहणी आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात काय निर्णय घेण्यात येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधीही टिकटॉक अॅपवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, काहीदिवसात ही बंदी हटवण्यात आली होती.
बाइट डान्स चीनी कंपनीने 2016 साली टिकटॉक हे अॅप भारतात लॉन्च केले होते. यानंतर या अॅपची लोकप्रियता झपाट्याने वाढू लागली. यावर हीना दरवेश नामक मुंबईतील गृहणीने टीकटॉक विषयी आपले मत मांडले आहे. सध्या तरुणांमध्ये टीकटॉकचे वेड अधिकच वाढले आहे. यामुळे त्यांच्यावर वाईट परिणाम होत आहेत. यामुळे हीना यांनी टीकटॉक अॅपवर बंदी घाला, अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या अॅपमुळे मुलांवर वाईट संस्कार होतात, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. परंतु, मुंबई उच्च न्यायालय या याचिकेवर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे देखील वाचा- BSNL ग्राहकांसाठी खुशखबर! 'या' प्लानमध्ये मिळणार दिवसाला 2 जीबी डेटा
टिक-टॉक हे एक सोशल मीडिया अॅप्लिकेशन आहे. या अॅपच्या मदतीनं स्मार्टफोन युजर्स छोटे-छोटे व्हिडिओ बनवून शेअर करू शकतात. 'बाइट डान्स' नामक कंपनीनं 2016 साली हे अॅप लाँच केलं आहे. या अॅपची लोकप्रियता झपाट्यानं वाढत असून ऑक्टोबर 2018 मध्ये अमेरिकेत हे अॅप सर्वाधिक डाउनलोड होणारे अॅप ठरले आहे. महत्वाचे म्हणजे, 13 वर्षांवरील व्यक्तीनेच टिक-टॉक अॅप वापरावे असे कंपनीचे सांगणे आहे. कॉमन सेन्स मीडियाच्या मते, टिक-टॉकवरील कंटेट पाहता 16 वर्षे व त्यावरील वयाच्या व्यक्तीनंच हे अॅप वापरणे योग्य आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.