पिंपरी-चिंचवड: प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिसांनी अंध महिलेवर सोपवला आयुक्तांच्या पदाचा कार्यभार
Maharashtra Police | (PTI photo)

पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) मध्ये प्रजासत्ताक दिन(Republic Day) पोलिसांनी अनोख्या पद्धतीने तो साजरा केला. त्यावेळी पोलिसांनी एका अंध महिलेवर आयुक्तांच्या पदाचा कार्यभार सोपवला. तसेच सहपोलीस आयुक्तांच्या पदावर एका विधवा महिलेला मान दिला गेला. त्याचसोबत एका विद्यार्थ्याला पोलीस आयुक्तांच्या पदाचा कार्यभार दिला गेला होता. पोलिसांनी या सर्वांना पोलीस आयुक्तांना जसे सेल्यूट केले जाते त्याच पद्धतीने सेल्यूट केले. या सर्वांसाठी हा एक अनोखा क्षण होता.(President Police Medal Announced: राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा, महाराष्ट्रातील 57 पोलिसांना मिळाला हा बहुमान)

अंध महिला रीना यांना कार्यभार दिल्यानंतर आनंद व्यक्त केला. त्यांनी असे म्हटले की, आम्हाला फक्त ऐकू येते. परंतु जे काही ऐकले ते सर्व खरं झालं. पोलीस हे खरंच सामान्य व्यक्तींचे मित्र असतात आणि पदाचा भार दिल्यानंतर कायद्याची अंमलबजावणी करणे सुद्धा तितकेच महत्वाचे असून त्यामुळे महिला सुरक्षित राहतील असे ही रीना यांनी म्हटले. (Republic Day 2021: तिरंगी रंगात सजली मुंबई; प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि महानगरपालिकेच्या इमारतीला विद्युत रोषणाई)

तर एखाद्या महिलेवर अन्याय झाल्यास ती प्रथम पोलिसात धाव घेते. कारण पोलीस आपल्याला मदत करतील याच आशेने ती त्यांच्याकडे जाते. विधवा महिलेने  असे म्हटले की, नवऱ्याच्या निधनानंतर काही मानसिक विकृतीची लोक भेटली. यामुळे खचून गेले. पण सोबत असलेल्या तरुण मुलीचा सांभाळ करायचा असल्याने पोलिसांनी या कार्यासाठी बळ दिले. त्यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त आयुक्तांचा कार्यभार सोपवल्याने अधिकच बळ वाढल्याचे विधवा महिलेने म्हटले आहे.