President Police Medal Announced: राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा, महाराष्ट्रातील 57 पोलिसांना मिळाला हा बहुमान
President Police Medal (Photo Credits: Twitter)

पोलिसांसाठी महत्त्वाच्या समजल्या जाणा-या 'राष्ट्रपती पदकांची (President Police Medal) नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या महत्त्वाच्या पदकांची घोषणा करण्यात आली आहे. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पदकांमधील महाराष्ट्रातील 57 पोलिसांनी ह्या राष्ट्रपती पोलीस पदकांवर मोहोर उमटवली आहे. ही राज्यासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. या राष्ट्रपती पोलीस पदकांच्या घोषणेची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत असतात. नुकतीच या पदकांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याचे सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचा देखील समावेश आहे.

महाराष्ट्रातील ज्या 57 पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदक मिळाले आहेत त्यात 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक, राज्यातील 13 पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस शौर्य पदक तर राज्याला 40 पोलीस पदक मिळाले आहेत.हेदेखील वाचा- प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचं ‘ऑल आऊट’ ऑपरेशन; शस्त्र घेऊन फिरणाऱ्या 33 जणांना अटक

अत्यंत प्रतिकूल परिस्थिती जनतेसाठी दिवसरात्र झटणा-या पोलिसांसाठी पदकांच्या स्वरुपात त्यात अविरत कामाला सलाम करण्यासाठी ही पदके दिली जातात. वेळप्रसंगी आपल्याला कुटूंबाला दूर लोटून इतरांचे कुटूंब सुरक्षित राहावे म्हणून स्वत:च्या घरापासून दूर राहतात. अशा पोलिसांना या पदकांच्या स्वरुप त्यांच्या अमूल्य योगदानाची प्रशंसा करण्यासाठी यापेक्षा दुसरे चांगले माध्यम असूच शकत नाही.

यासह राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार देखील घोषित करण्यात आले आहेत. यात 4 मुले आणि एका मुलीचा समावेश आहे.